Sachin Tendulkar Stepping Down As Mentor : इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा सीझन सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. गुजरात टायटन्सला 'अच्छे दिन' दाखवणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघात सामील करून त्याच्याकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपविण्यात आलंय. तब्बल दहा वर्षे नेतृत्व करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) यापुढे मुंबई संघात तर असेल. मात्र, कर्णधारपद सांभाळू शकणार नाही. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून फॅन्स उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच आता मुंबई इंडियन्सची ओळख असलेला सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) देखील आता मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईच्या निर्णयावर सचिन तसेच संघातील काही खेळाडू देखील नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता सचिन तेंडूलकर कोणता निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाच्या महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने मुंबई इंडियन्ससाठी 78 सामन्यांमध्ये 2234 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडूलकरने मुंबईसोबत मेटॉर म्हणून काम केलं होतं. त्यात सचिनने रोहित अँड कंपनीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
#HardikPandya को कप्तानी सौंपते ही #MumbaiIndians में हलचल, #SachinTendulkar ने भी मेंटर की पोजिशन छोड़ी pic.twitter.com/sm8lvTbant
— Zee Business (@ZeeBusiness) December 17, 2023
दरम्यान, मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला, ज्याने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये पाच विजेतेपदे जिंकली आहेत. हा कारनामा मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केलाय. मात्र, आता रोहितलाच नारळ दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून काहींनी मुंबई इंडियन्सचे टी-शर्ट देखील जाळले आहेत.