सचिन तेंडूलकरने मिताली राजला दिला हा खास सल्ला

'क्रिकेट' हा भारतात धर्म समजला जातो.

Updated: Oct 11, 2017, 08:56 PM IST
सचिन तेंडूलकरने मिताली राजला दिला हा खास सल्ला title=

मुंबई : 'क्रिकेट' हा भारतात धर्म समजला जातो.

महिला क्रिकेटपटूंकडे चाहत्यांप्रमाणेच, सरकारचेही थोडे दुर्लक्षच होते. नुकतेच भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हीने ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा मोठा टप्पा पार करणारि मिताली ही एकमेव खेळाडू आहे. 

मितालीच्या या यशानंतर किक्रेटचा देव समजल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरनेही तिची भेट घेऊन कौतुक केले आहे. 

सचिन तेंडुलकरने मितालीची भेट घेतल्यानंतर तिचे कौतुक केले सोबतच अभिनंदन करताना एक महत्त्वाचा सल्ला देखील दिला. ' तुला अजून खूप खेळायचं आहे. त्या मुळे हार मानू नकोस. तुझ्या खेळातील सातत्य जप' असा सल्ला दिल्याची माहिती मितालीने दिली आहे. 

सचिनने यापूर्वी मितालीला बॅट गिफ्ट दिली होती. त्याचा वापर मितालीने देशा-परदेशात खेळताना केल्याचीही माहिती दिली आहे. 

मितालीने आगामी वर्ल्डकपसाठी अधिक जोमाने तयारी करत असल्याची माहिती दिली आहे. तसेच २०२१मधील वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्त्वही करणार आहे.