875 दिवसांनी सचिन तेंडुलकरचं लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन, भारताचं नेतृत्व करणार

Sachin Tendulkar :  52 वर्षांच्या सचिनची फॅन फॉलोईंग अजूनही कमी झालेली नाही. ऑक्टोबर 2022 नंतर मास्टर ब्लास्टर सचिन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 30, 2025, 04:10 PM IST
875 दिवसांनी सचिन तेंडुलकरचं लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन, भारताचं नेतृत्व करणार  title=
(Photo Credit : Social Media)

International Master League : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून  निवृत्ती घेतली त्याला  आता अनेक वर्ष लोटली आहेत. मात्र असं असलं तरी 52 वर्षांच्या सचिनची फॅन फॉलोईंग अजूनही कमी झालेली नाही. ऑक्टोबर 2022 नंतर मास्टर ब्लास्टर सचिन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. तो आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भारताचा कर्णधार असणार असून संघाचे नेतृत्व करणार आहे. 22 फेब्रुवारी पासून श्रीलंका विरुद्ध भारत या सामन्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भारतासहीत 6 संघांचा सहभाग असणार असून ही स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. भारत, श्रीलंका, वेस्टइंडीज, दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया  आणि इंग्लंड या देशातील निवृत्त क्रिकेटर्स या स्पर्धेत सामील होतील. यात भारताकडून सचिन तेंडुलकर, श्रीलंकेकडून कुमार संगकारा, वेस्टइंडीजचा ब्रायन लारा, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, दक्षिण आफ्रिकेचा जॅक्स कॅलिस आणि इंग्लंडच्या इयान मोर्गन सारखे खेळाडू आपल्या देशांच्या संघाचं नेतृत्व करतील. 

या संघांचा असणार सहभाग : 

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये एकूण सहा संघांचा सहभाग असणार असून यात भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण अफ्रीका, इंग्लंड, वेस्ट इंडीज इत्यादींचा समावेश आहे. ही स्पर्धा नवी मुंबई, राजकोट आणि रायपूर या मैदानांवर खेळवली जाईल. 

हेही वाचा : विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर फॅन्सची मारामारी आणि तोडफोड, गेट समोर चपलांचा खच

 

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा फॉर्मेट : 

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धा राऊंड-रोबिन स्वरूपात असेल आणि त्यानंतर नॉकआऊट स्टेज असेल. राऊंड-रोबिन टप्प्यात प्रत्येक संघ इतर पाच संघांविरुद्ध सामना खेळेल. सर्वोच्च गुणांसह अव्वल चार संघ राऊंड-रोबिन टप्प्यानंतर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दोन उपांत्य फेरीच्या विजेत्यांना 16 मार्च रोजी रायपूरमधील अंतिम सामन्यात एकमेकांशी सामना करावा लागणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x