कोलकाताच्या पराभवानंतर साक्षी धोनीने शाहरुखला इशाऱ्यातून काय सांगितले...पाहा व्हिडीओ

कोलकाता आणि चेन्नई यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने बाजी मारली. 

Updated: Apr 12, 2018, 08:57 AM IST
कोलकाताच्या पराभवानंतर साक्षी धोनीने शाहरुखला इशाऱ्यातून काय सांगितले...पाहा व्हिडीओ title=

चेन्नई : कोलकाता आणि चेन्नई यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने बाजी मारली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. चेन्नईविरुद्ध कोलकाताला पाच विकेटनी पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर कोलकाताचा मालक आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने इशाऱ्यातून काही खास गोष्ट सांगितली.

शाहरुख नेहमीच आपल्या संघाचा पराभव सकारात्मकतेने घेतो आणि संघाचा उत्साह वाढतो. पराभवानंतर शाहरुखने साक्षीला मिठी मारत विजयाबद्दल अभिनंदन केले. यादरम्यान त्यांच्यात बातचीतही झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रिपोर्ट्स नुसार व्हिडीओमध्ये साक्षी हाताचे इशारे करत शाहरुखला काहीतरी सांगतेय. ती म्हणतेय पराभवामुळे उदास झाले नाही पाहिजे. साक्षीच्या या सल्ल्यावर शाहरुख हसताना दिसतोय.

या सामन्यात कोलकाताने चेन्नईसमोर विजयासाठी २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र चेन्नई संघाने अखेरच्या षटकांत १७ धावा करताना आणि एख चेंडू राखत लक्ष्य पूर्ण केले.