SEX TAPE अष्टपैलू जयसूर्या असं का वागला? यापूर्वीच्या पत्नीचा सेक्स टेपचा त्याने असा वापर का केला?

जयसूर्या हा श्रीलंका क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि धडाकेबाज मॅच ओपनर आहे.

Updated: Jun 9, 2021, 07:04 PM IST
SEX TAPE अष्टपैलू जयसूर्या असं का वागला? यापूर्वीच्या पत्नीचा सेक्स टेपचा त्याने असा वापर का केला? title=

कोलंबो : क्रिकेटर आणि लाईम लाइट यांचा जवळचा संबंध आहे. एखाद्या क्रिकेटरने काहीही करु दे, ते लगेच चर्चेत येतात. बहुतेक क्रिकेटर हे त्यांच्या चांगल्या खेळामुळे, त्यांच्या अफेअरमुळे किंवा समाजकार्यामुळे चर्चेत आले आहेत. पंरतु आपल्याच बायकोचा सेक्स व्हीडिओ लिक करुन चर्चत आलेला क्रिकेटर  तुम्हाला माहित आहे? या क्रिकेटरने हे त्याच्या तिसऱ्या बायकोचा बदला घेण्यासाठी केले असल्याचे समोर आले आहे. परंतु नक्की असे काय घडले असावे की, या दिग्गज क्रिकेटरला इतके टोकाचे पाऊल उचलले असावे? या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला खालील माहितीत नक्की मिळतील.

या क्रिकेटरचे नाव सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आहे. जयसूर्या हा श्रीलंका क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि धडाकेबाज मॅच ओपनर आहे. तो जितके त्याच्या खेळामुळे चर्चेत आला तितकाच तो त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे ही चर्चत आला आहे.

मीडिया वृत्तानुसार सन 2017 मध्ये अशी बातमी आली होती की, सनथ जयसूर्याने तिसरी पत्नी मलिका सिरीसेनाचा आक्षेपार्ह सेक्स टेप लीक केली होती. त्याने तिचा बदला घेण्याच्या उद्देशाने , हे काम केले असल्याचे समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

जयसूर्याने त्याच्या आयुष्यात आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. त्यीने 1998 एयर श्रीलंकाच्या ग्राउंड होस्टेस सुमुदु करुणानायक बरोबर लग्न केले. परंतु एका वर्षातच त्यांचे लग्न तुटले. त्यानंतर त्यांने 2000 मध्ये एयर होस्टेस संद्रा डिसिल्वासोबत दुसरे लग्न केले, त्यानंतर या दोघांना तीन मुले झाली. नंतर त्यांचा 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. खरेतर त्याचे सिरिसेना सोबत अफेअर असल्याने त्याने आपल्या दुसऱ्या बायकोला घटस्फोट दिला होता.

सनथ जयसूर्या आणि मलिका सिरिसेना यांनी गुपचुप एका मंदिरात जाऊन लग्न केले होते. सिरिसेना ही अभिनेत्री आहे. त्या दोघांनी फेब्रुवारी 2012मध्ये लग्न केले होते. त्यानंतर काही महिन्यातच सिरिसेनाने त्याला सोडले आणि एका बिझनेसमॅनसोबत लग्न केले. त्यामुळे सिरिसेनाचा बदला घेण्यासाठी आणि तिला धडा शिकवण्यासाठी त्याने तिचा सेक्स टेप इंटरनेटवर लिक केल्याचे समोर आले आहे.