सानिया, रोहनची अमेरिकन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची अमेरिकन ओपनमधील घोडदौड सुरुच आहे. तिनं डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सानियानं आपली चीनी पार्टनर शुयाई पेंगसमवेत डबल्सच्या तिस-या राऊंडमध्ये सोरोना आणि सारा या जोडीवर 6-2, 3-6, 7-6नं विजय मिळवला. 

Updated: Sep 4, 2017, 10:35 PM IST
सानिया, रोहनची अमेरिकन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक title=

न्यूयॉर्क : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची अमेरिकन ओपनमधील घोडदौड सुरुच आहे. तिनं डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सानियानं आपली चीनी पार्टनर शुयाई पेंगसमवेत डबल्सच्या तिस-या राऊंडमध्ये सोरोना आणि सारा या जोडीवर 6-2, 3-6, 7-6नं विजय मिळवला. 

तर भारताच्या रोहन बोपन्नाचीही अमेरिकन ओपनमधील आगेकूच सुरु आहे. त्यानं मिक्स डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहेत. बोपन्नानं आफला कॅनडीयन पार्टनर गॅब्रिएलसमवेत जोस आणि निकॉलस या जोडीवर 6-3, 6-4नं विजय साकारला.

भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेसचं अमेरिकेन ओपनमध्ये डबल्समधील आव्हान संपुष्टात आलं आहे. पेस आणि त्याचा पार्टनर पुरव राजा यांना रशियन जोडी कोरेन आण एँड्र्यूकडून 6-4, 7-6नं पराभव पत्करावा लागला. विंस्टन-सालेममध्ये पेस-राजा जोडी एकत्र खेळली होती. त्या स्पर्धेतही पहिल्याच राऊंडमध्ये त्यांना पॅक अप करण भाग पडलं होतं.