सानिया मिर्झाच्या बहिणीचा या क्रिकेटरच्या मुलाशी विवाह

टेनिसपटू सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा विवाहबंधनात

Updated: Dec 12, 2019, 01:37 PM IST
सानिया मिर्झाच्या बहिणीचा या क्रिकेटरच्या मुलाशी विवाह

मुंबई : टेनिसपटू सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा विवाहबंधनात अडकली आहे. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनच्या मुलासोबत तिचा विवाह झाला आहे. अनम आणि असद यांनी एकमेकांना आपला जीवनसाथी म्हणून निवडलं आहे. अनम मिर्झा आणि असदने विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनम आणि असदच्या ग्रँड वेडिंगला कुटुंबातील लोकं आणि मित्र परिवार उपस्थित होता.

असदसोबत अनमचा हा दुसरा विवाह आहे. याआधी अनमने बिझनेसमन अकबर रशीदसोबत २०१६ मध्ये विवाह केला होता. पण त्यांचं नातं जास्त दिवस टिकू शकलं नाही. त्यानंतर अनमने अकबर रशीदला घटस्फोट दिला होता.

असद आणि अनम गेल्या अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. त्य़ांचे अनेक फोटो देखील समोर आले होते. सानिया मिर्झाने देखील असद कुटुंबाचा भाग असल्याचं म्हटलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mr and Mrs #alhamdulillahforeverything #AbBasAnamHi @weddingsbykishor @daaemi

A post shared by Anam Mirza (@anammirzaaa) on

आयपीएलच्या १२व्या मोसमात कोलकाता आणि हैदराबादची मॅच दरम्यान सानिया मिर्झासोबत तिची बहिणी अनम मिर्झाही उपस्थित होती. पण त्यांच्यासोबत असलेल्या असदला पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अनम आणि असद हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सुरु झाली होती. असद आणि अनम या दोघांचं लग्न या वर्षाच्या शेवटी होणार अशी शक्यता खरी ठरली.