Saurabh Tiwary retirement : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यासाठी टीम इंडिया (Indian Cricket Team) आता तयारीला देखील लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा मिडल ऑर्डर खेळाडू सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. लांब लांब केस अन् उंचच्या उंच छकडे मारण्याची ताकद असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याने क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलंय. विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जेव्हा अंडर-19 विश्वचषक 2008 चे विजेतेपद पटकावलं होतं, तेव्हा विजेतेपद पटकावणाऱ्या संघात सौरभ तिवारीचाही समावेश होता.
सौरभ तिवारी सध्या रणजी सामन्यात खेळत आहे. 34 वर्षीय सौरभ झारखंडसाठी शेवटचा सामना खेळणार असल्याची माहिती समोर आलीये. वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 2006-07 रणजी ट्रॉफी हंगामात त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने अंडर -19 संघात देखील जागा मिळवली होती. त्यानंतर त्याला 2006 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये संधी मिळाली. सौरभने आतापर्यंत 115 सामन्यांमध्ये 8030 धावा केल्या आहेत, ज्यात 22 शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 116 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 46.55 च्या सरासरीने 4050 धावा केल्या आहेत.
निवृत्ती घेताना सौरभ भावूक
क्रिकेटच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाला अलविदा म्हणणं थोडं कठीण आहे. पण त्यासाठी हीच योग्य वेळ आहे याची मला नक्की खात्री आहे. कारण मला वाटतं की, जर तुम्ही नॅशनल टीम आणि आयपीएलमध्ये नसाल, तर युवा खेळाडूसाठी तुम्ही तुमची जागा मोकळी करणं गरजेचं आहे. तरुणांना आगामी काळात संधी मिळाली. त्यांनी टीम इंडियामध्ये खेळावं, अशी माझी इच्छा आहे. त्यांना जागा मिळवी आणि उत्तम कामगिरी करावी म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं सौरव तिवारीने सांगितलंय. मलाही राजकारणाच्या ऑफर आल्या आहेत पण मी त्याचा विचार केलेला नाही, असं स्पष्टीकरण देखील तिवारीने एका मुलाखतीत दिलं आहे.
दुसरा धोनी अशी ओळख
टीम इंडियामध्ये धोनी त्याच्या लांब केसांमुळे चर्चेत आला होता. त्यामुळे देशभरात लांब केसांची क्रेझ होती. सौरभ तिवारी टीम इंडियामध्ये आला तेव्हा त्याची केस धोनी सारखे असायचे. तसेच लांबच्या लांब सिक्स मारण्यात सौरभ तिवारी पटाईत होता. आयपीएलमध्ये त्याने अनेक सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, आरसीबी, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी त्याने फलंदाजी केली आहे.