श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी या खेळाडूंना विश्रांती?

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 सीरिजसाठी आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. 

Updated: Aug 10, 2017, 10:00 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी या खेळाडूंना विश्रांती? title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 सीरिजसाठी आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जडेजानं १०८.२ तर अश्विननं १०८.३ ओव्हर्स टाकल्या आहेत. या सीरिजमध्ये जडेजानं १३ तर अश्विननं ११ विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या टेस्टसाठी जडेजाचं निलंबन झालं आहे.

या दिग्गजांना विश्रांती दिली तर भारतीय संघामध्ये युझुवेंद्र चहाल, अक्सर पटेल किंवा कृणाल पांड्याची वर्णी लागू शकते. तर जसप्रीत बुमराहची निवड ही निश्चित मानली जात आहे.  

येत्या वर्षामध्ये भारतीय संघ घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. तर नवीन वर्षात भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारत पुन्हा श्रीलंकेमध्ये जाऊन इंडिपेन्डन्स कप खेळेल. त्यानंतर २०१८च्या आयपीएलला सुरुवात होईल. भारताचं हे व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 सीरिजसाठी दिग्गजांना विश्रांती मिळू शकते.

वनडे आणि टी20 सामन्याचं वेळापत्रक

२० ऑगस्ट - पहिली वनडे डम्बुला

२४ ऑगस्ट - दुसरी वनडे कँडी

२७ ऑगस्ट - तिसरी वनड कँडी

३१ ऑगस्ट - चौथी वनडे कोलंबो

३ सप्टेंबर - पाचवी वनडे कोलंबो

६ सप्टेंबर - एकमेव टी-२० कोलंबो