व्हिनस विल्यमच्या घरी 4,00,000 डॉलरची चोरी

  व्हिनस विल्यम ही टेनिस जगतातील एक अग्रगण्य खेळाडू आहे. मात्र यंदा युएस ओपन स्पर्धेचा भाग असताना तिच्या राहत्या घरी चोरी झाल्याचे वृत्त आहे.  

Updated: Nov 19, 2017, 09:22 AM IST
व्हिनस विल्यमच्या घरी 4,00,000 डॉलरची चोरी

अमेरिका :  व्हिनस विल्यम ही टेनिस जगतातील एक अग्रगण्य खेळाडू आहे. मात्र यंदा युएस ओपन स्पर्धेचा भाग असताना तिच्या राहत्या घरी चोरी झाल्याचे वृत्त आहे.  

व्हिनस ही अमेरिकन खेळाडू आहे. फ्लोरिडा येथील तिच्या राहत्या घरावर चोरांनी तब्बल 4,00,000 डॉलर वस्तूंवर डल्ला मारला आहे. 

कधी झाली चोरी ? 

स्थानिक मिडिया ने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, १-५ सप्टेंबर दरम्यान व्हिनसच्या राहत्या घरी चोरी झाली आहे. या चोरीदरम्यान नेमक्या कोणत्या गोष्टी चोरीला गेल्या आहेत याबाबतची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.  संबंधित चोरी प्रकरणी  पोलिस अधिक तपास करत आहेत. 

व्हिनसचं यंदाचं वर्ष उत्तम  

यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये व्हिनस फायानल्समध्ये पोहचली होती. तसेच अंतिम ग्रॅन्ड स्लॅम युएसए ओपनच्या सेमीफायनलमध्येही ती पोहचली होती. 
व्हिनस डब्लयुटीए फायनल्समध्ये पोहचली होती.  तेथे डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीवर तिने मात केली होती.