भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजआधी कोरोनाचं संकट, 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजआधी कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे.

Updated: Jul 6, 2021, 03:09 PM IST
भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजआधी कोरोनाचं संकट, 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजआधी कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. टीम इंडियासाठी हा धोक्याचा इशारा आहे. तर इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे 7 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

इंग्लंड संघाला क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान वन डे सीरिजआधी इंग्लंडच्या खेळाडूंसह सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वन डे सीरिजचा पहिला सामना 8 जुलै रोजी खेळण्यात येणार आहे. 

भारत विरुद्घ इंग्लंड कसोटी सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सीरिजआधी इंग्लंड संघाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने टेन्शन वाढलं आहे. टीम इंडियाने चॅम्पियनशिप गमवलं आहे. आता इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची सीरिज खेळण्यात येणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.