Shakib Al Hasan Angry Video : रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) संघाने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. बांगलादेश संघाचा पाकिस्तानवर पहिला कसोटी विजय आहे. पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात अत्यंत खराब फलंदाजी केली. बांगलादेशने फिरकीची जादू पाकिस्तानला दाखवली अन् अशक्य असा सामना फिरवला. पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात 10 गडी राखून पराभूत करणारा बांगलादेश हा पहिला संघ ठरला. त्यामुळे आता पाकिस्तानची संपूर्ण जगात नाचक्की झाल्याचं चित्र पहायला मिळतंय. अशातच आता बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना शाकिब अल हसनने रागाच्या भरात रिझवानच्या अंगावर बॉल मारल्याची घटना समोर आली. पाकिस्तानची दुसरी इनिंग सुरू असताना रिझवान 18 धावांवर खेळ होता. त्यावेळी शाकिब आपली 8 वी ओव्हर घेऊन आला. शाकिब गोलंदाजी करत असताना रिझवान आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटॉन दास यांच्यात बोलणं सुरू होतं. त्याचवेळी शाकिब बॉल फेकण्यासाठी आला पण फलंदाज तयार नसल्याचं पाहून शाकिबला राग आला अन् त्याने फलंदाजाच्या दिशेने बॉल फेकला. त्यावेळी विकेटकिपरने बॉल झेलला पण अंपायरला शाकिबचं हे वागणं आवडलं नाही.
अंपायरने आक्षेप घेतल्यानंतर शाकिबने अंपायरची माफी मागितली. पण त्याचवेळी कॅप्टन नजमुल हुसेन शांतो अंपायर जवळ आला अन् फलंदाजाची चूक असल्याचं सांगितलं. प्रकरण शांत झालं, शाकिब पुन्हा पुढचा बॉल घेऊन आला अन् रिझवानने मिड ऑफच्या दिशेने बॉल लोटवला. त्यावेळी देखील रिझवानने ओरडून संताप व्यक्त केला. नेटकऱ्यांनी देखील शाकिबला या प्रकरणावरून टीका केली आहे. शाकिब हा माज बरा नव्हे, तू पाकिस्तानमध्ये आहे, बांगलादेशमध्ये नाही, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
Mental state like Shakib Al Hasan
Academic performance like Babar Azam pic.twitter.com/G3noKlmhzr— Dinda Academy (@academy_dinda) August 25, 2024
दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) शाकिब अल हसनला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तत्काळ काढून टाकण्याची विनंती करणारी कायदेशीर नोटीस मिळाली आहे, कारण त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. सध्या सुरू असलेला पहिला कसोटी सामना संपल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं बीसीबीच्या नवनियुक्त अध्यक्षांनी म्हटलं आहे.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.