close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अभिनेत्रीला मारहाण प्रकरणी शेन वॉर्नला क्लीनचीट

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्न याला पॉर्नस्टारला मारहाण प्रकरणी क्लीनचीट मिळाली आहे. वॉर्नवर झालेल्या या मारहाणीच्या आरोपांमुळे त्याला धक्का बसला आहे. 

Updated: Sep 25, 2017, 06:47 PM IST
अभिनेत्रीला मारहाण प्रकरणी शेन वॉर्नला क्लीनचीट

लंडन : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्न याला पॉर्नस्टारला मारहाण प्रकरणी क्लीनचीट मिळाली आहे. वॉर्नवर झालेल्या या मारहाणीच्या आरोपांमुळे त्याला धक्का बसला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४८ वर्षीय शेन वॉर्नला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्याला सोडण्यात आलं आहे. यावर वॉर्न म्हणाला की, ‘मी मारहाण केल्याच्या मीडियातील खोट्या बातम्यांमुळे तो स्तब्ध झाला होता. मी चौकशीत पोलिसांना सगळं सहकार्य केलंय. त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. आणि साक्षीदारांचे जबाब आहेत. मला सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी पुढे कोणतीही अ‍ॅक्शन घेतली जाणार नाही. हे प्रकरण आता संपलंय’.

दरम्यान, पॉर्नस्टार वालेरी फोक्सने शनिवारी ट्विटरवर जखमी चेह-याचा फोटो शेअर केला होता. तिने शेन वॉर्नवर मारहाणीचा आरोप लावला होता. याआधीही शेन वॉर्न अशाच काही मारहाणीच्या प्रकरणांमुळे वादात सापडला होता.