Shikhar Dhawan: टीम इंडियामध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? 'या' खेळाडूचं नाव घेत शिखरने दाखवला गोल्डन मार्ग!

Shikhar Dhawan On World Cup 2023: वर्ल्ड कपचा शंखनाद होण्याआधी आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये बीसीसीआयकडे संधी असणार आहे. यासाठी टीम (Team India) कशी असेल, यावर सर्वांचं लक्ष लागलंय.

Updated: Aug 11, 2023, 06:48 PM IST
Shikhar Dhawan: टीम इंडियामध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? 'या' खेळाडूचं नाव घेत शिखरने दाखवला गोल्डन मार्ग! title=
Shikhar Dhawan, World Cup 2023

Shikhar Dhawan on No. 4 Batting Position: आगामी वर्ल्ड कपआधी (World Cup 2023) सर्वांची धाकधुक वाढलीये, त्याचं कारण टीम इंडियातील नंबर 4 ची जागा... मागील चार वर्षात तब्बल 13 खेळाडूंना टीम इंडियातील क्रमांक 4 च्या (No 4 Batting Position) पोझिशनसाठी खेळवण्यात आलंय. मात्र, कोणत्याही खेळाडूला या जागेवर सेट होता आलं नाही. त्याला कारण सिलेक्टर्सचं ढिसाळ मॅनेजमेंट. आता आशिया कप (Asia Cup 2023) आणि वर्ल्ड कप तोंडावर आलाय. त्यामुळे कोणत्या खेळाडूला संधी मिळणार, यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता टीम इंडियाचा गब्बर आणि स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने मोठं वक्तव्य केलं आहे.

वर्ल्ड कपचा (ICC World Cup 2023) शंखनाद होण्याआधी आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये बीसीसीआयकडे संधी असणार आहे. यासाठी टीम कशी असेल, यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता  सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), संजू सैमसन (Sanju Samson) आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांच्यात चढाओढ सुरू असतानाच आता शिखर धवनने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. नेमकं काय म्हणतो गब्बर पाहुया...

नंबर 4 वर कोण?

टीममधील जर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न असेल तर मी सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) सारखा पर्याय निवडणं मला योग्य वाटेल. सूर्या एक अनुभवी खेळाडू आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, असं शिखर म्हणतो. शुभमन गिल ( Shubhman Gill ) आगामी वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करतो, यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. त्याचबरोबर मला रोहित शर्माच्या फलंदाजीची देखील प्रतिक्षा असेल. आमच्याकडे खूप चांगली टीम आहे ज्यात अनुभव आणि तरुणाईचा योग्य वावर आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा आम्हाला मिळेल. आम्हाला मैदान आणि खेळपट्ट्या माहित आहेत आणि ते आमच्या फायद्याचे असेल, असं शिखर धवन म्हणतो.

आणखी वाचा - Asia Cup 2023: सिलेक्टर्सचा धक्कादायक निर्णय; 'या' खेळाडूला अचानक केलं कॅप्टन!

दरम्यान, भारतीय संघातील अनुभवी फलंदाज शिखर धवन गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. अशातच आशियाई क्रीडा स्पर्धेतून वगळल्याबद्दल शिखर धवनने खदखद व्यक्त केलीये. एशियन गेम्ससाठी टीममध्ये निवड न झाल्याने मला धक्का बसला. मात्र, निवड समितीचा गेम प्लॅन नक्कीच वेगळा असेल, एक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला काही गोष्टी स्विकाराव्या लागतात. मी पुन्हा जोमाने कमबॅक करेल, असं आश्वासन शिखर धवनने चाहत्यांना दिलं आहे.