BCCI Interim Chief Selector: चेतन शर्मा यांनी बीसीसीआयच्या (BCCI) मुख्य निवडकर्तेपदाचा (Chief Selector) राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार, शिव सुंदर दास (Shiv Sundar Das) यांना बीसीसीआयचे अंतरिम मुख्य निवडकर्ता बनवलं जाऊ शकतं. लवकरच याबाबत औपचारिक घोषणाही होण्याची शक्यता आहे. (shiv sundar das will be new interim chief selector bcci after chetan sharma resign)
चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांच्याकडे सोपवला. त्यांची बीसीसीआयमधील ही दुसरी टर्म होती. पर्याय नसल्याने बीसीसीयआयने चेतन शर्मा यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला होता. त्याआधी त्यांना 40 दिवसांपूर्वी राजीनामा द्यावा लागला होता.
चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर चार सदस्यीय टीमची जबाबदारी शिव शंकर दास यांच्याकडे असणार आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. 5 नोव्हेंबर 1977 रोजी भुवनेश्वर, ओडिशा येथे जन्मलेल्या एसएस दास यांनी टीम इंडियासाठी 23 कसोटी आणि 4 वनडे सामने खेळले आहेत.
BCCI chief selector Chetan Sharma resigns from his post. He sent his resignation to BCCI Secretary Jay Shah who accepted it.
(File Pic) pic.twitter.com/1BhoLiIbPc
— ANI (@ANI) February 17, 2023
चेतन शर्मा यांच्यानंतर ते या समितीमधील सर्वात अनुभवी आहेत. 2021 मध्ये ते भारतीय महिला संघाचे बॅटिंग कोचही राहिले आहेत. 2016 मध्ये ते भारताच्या 16 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील संघांचे कोचही होते. त्यामुळे त्यांचा युवा खेळाडूंवर प्रभाव दिसून येतो.