...आणि शोएब अख्तरला आली शाहरुखची आठवण

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबतची एक आठवण ट्विटवर शेअर केली आहे.

Updated: Aug 17, 2017, 06:37 PM IST
...आणि शोएब अख्तरला आली शाहरुखची आठवण  title=

मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबतची एक आठवण ट्विटवर शेअर केली आहे. आयपीएलमध्ये केकेआरच्या विजयाच्या जल्लोषाचा हा जुना फोटो शोएबनं शेअर केला आहे.

सुपर स्टार, मित्र आणि नम्र अशा शाहरुखसोबतची एक आठवण असं ट्विट शोएबनं केलं आहे. आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही सिझनमध्ये पाकिस्तानचे क्रिकेटपटू खेळले पण भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेल्यामुळे नंतर मात्र या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. असं असलं तरी शोएबनं शाहरुखबद्दलचं प्रेम जाहीर केलं आहे.

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या मॅचमध्ये शोएबचं आयपीएलमध्ये आगमन झालं. या मॅचमध्ये शोएबनं ११ रन्सच्या मोबदल्यात ४ विकेट घेऊन केकेआरला विजयी केलं. १३३ रन्सचा पाठलाग करताना केकेआरनं दिल्लीला फक्त ११० रन्सवर रोखलं होतं. या शानदार कामगिरीसाठी शोएबला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं.