श्रद्धा कपूरने धोनीसाठी केलं खास Tweet

टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर चक्क बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने धोनीसंदर्भात एक खास ट्विट केलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 2, 2017, 10:11 PM IST
श्रद्धा कपूरने धोनीसाठी केलं खास Tweet  title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर चक्क बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने धोनीसंदर्भात एक खास ट्विट केलं आहे.

३०० इंटरनॅशनल वन-डे मॅचेस खेळणारा महेंद्र सिंग धोनी हा सहावा भारतीय ठरला आहे. तर, जगातील २०वां क्रिकेटर बनला आहे. धोनीने श्रीलंकेविरोधात चौथी वन-डे मॅच खेळत आपली मॅचेसची ट्रिपल सेंच्युरी केली आहे. धोनीच्या आधी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकर (४६३ वन-डे), राहुल द्रविड (३४४ वन-डे), मोहम्मद अझहरुद्दीन (३३४ वन-डे), सौरव गांगुली (३११ वन-डे) आणि युवराज सिंग (३०२ वन-डे) खेळले आहेत.

धोनीच्या या रेकॉर्डचं क्रिकेट जगतापासून बॉलिवूडकरांनीही कौतुक केलं आहे. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरचाही समावेश आहे. श्रद्धाने ट्विट करत असं काही लिहीलं आहे की ज्यामुळे धोनीचे चाहतेही प्रचंड खूश झाले आहेत.

श्रद्धाने ट्विट करत धोनीला एक लेजेंड आणि ट्रू चॅम्पियन म्हटलं आहे.

धोनीचं अभिनंदन करत अभिनेता अनिल कपूर याने लिहीलं आहे की, "विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सेंच्युरी. भारताचा विजय आणि एम. एस. धोनीने ३०० वन-डे मॅचेस खेळण्याचा केलेला रेकॉर्ड बनवला. लिविंग लेजेंड्स."

सोनमने म्हटलं आहे की, "तुम्हाला खेळताना पाहून नेहमीच चांगलं वाटतं."

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने लिहीलं आहे की, "आमचं मन सांगतं की, इतक्यात खूश होणार नाही. एक देशभक्त, मास्टर क्रिकेटर आणि एक अद्भुत मानव, शुभेच्छा धोनी."