धमाकेदार विजयानंतर श्रेयस-पृथ्वीचा जबरदस्त डान्स...

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद निभावणारा श्रेयस अय्यरने दिल्लीला विजय मिळवून दिला. 

Updated: Apr 28, 2018, 06:28 PM IST
धमाकेदार विजयानंतर श्रेयस-पृथ्वीचा जबरदस्त डान्स... title=

मुंबई : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद निभावणारा श्रेयस अय्यरने दिल्लीला विजय मिळवून दिला. यात भारताच्या अंडर १९ टीमचे कर्णधार पृथ्वी शॉ ने जबरदस्त साथ दिली. श्रेयसने ९३ धावांची तुफानी खेळी केली. तर पृथ्वी शॉ ने ६२ धावांची खेळ करुन आयपीएलमधील सर्वात कमी वयाचा अर्धशतक करणारा फलंदाज बनला. या मॅचमध्ये दिल्लीने कोलकत्ताला ५५ धावांनी हरवून लीग मधील दुसरा विजय काबीज केला. या मॅचपूर्वी दिल्लीची टीम सहा पैकी पाच सामने हरली होती. या ६ सामन्यांमध्ये गौतम गंभीर कर्णधार होता. इतकंच नाही तर फलंदाज म्हणूनही तो अपयशी ठरला. या अपयशामुळेच गौतमने कर्णधारपद सोडून दिले.

या यशानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अय्यर आणि पृथ्वी हिप हॉप म्युजिकवर डान्स करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पहा त्यांचा हा व्हिडिओ...

 

@prithvishaw @shreyas41 

A post shared by IPL 2018 UPDATES ⭕ (@iplupdates2018) on

दिल्ली टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत चार विकेटवर २१९ धावांचा जबरदस्त स्कोर केला आणि कोलकत्ताने ९ विकेटवर १६४ धावा केला. त्यामुळे दिल्लीचा ५५ धावांनी विजय झाला. श्रेयस अय्यरने नाबाद ९३ धावा आणि पृथ्वी शॉने उत्तम अर्धशतक करत स्कोरमध्ये चांगलीच भर घातली.