ख्रिस गेलला घ्यायला प्रितीच्या टीमकडे नव्हते पैसे पण...

 पंजाबच्या टीममधून खेळताना दिसला नसता. कारण त्याला घेण्यासाठी पुरेसे पैसे पंजाबच्या टीमकडे नव्हते.

Updated: Apr 27, 2018, 09:08 PM IST
ख्रिस गेलला घ्यायला प्रितीच्या टीमकडे नव्हते पैसे पण... title=

मुंबई : पंजाबची टीमसध्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांचा ख्रिस गेल तर आपल्या बॅटने रन्सचा पाऊस पाडतोय. त्याला कसा बॉल टाकायचा असा प्रश्न समोरच्या बॉलरला पडतो. हाच गेल कदाचित पंजाबच्या टीममधून खेळताना दिसला नसता. कारण त्याला घेण्यासाठी पुरेसे पैसे पंजाबच्या टीमकडे नव्हते. सहमालक नेस वाडियाने यासंदर्भातील खुलासा केलाय. शेवटपर्यंत पंजाबकडे कमी रक्कम शिल्लक होती. नंतर पंजाबने तिसऱ्या वेळेस २ कोटी एवढ्या किंमतीत खरेदी केले. 'आमच्याकडे फक्त २.१ कोटी रुपये शिल्लक होते. आम्ही आधीच गेलवर मोठी बोली लावली असती तर इतर कोणती तरी टीम त्याहून अधिक बोली लावून त्याला खरेदी शकली असती. पण आम्ही भाग्यवान ठरलो. निलामी आधी पंजाबने अक्षर पटेलला रिटेन केले होते.

टीकाकारांना उत्तर 

टीम बनविण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली होती. २ कोटीला गेलला खरेदी केल्यानंतर पंजाबकडे १ लाख रुपये राहिले. अशा रितीने त्यांनी ६७.५ कोटी रुपये खर्च केले. २ महिन्यानंतर गेलने टीकाकारांना आपल्या बॅटने उत्तर दिलं.  चार मॅचमध्ये त्याने २ अर्धशतक आणि १ शतक त्याने लगावले. त्याने आतपर्यंतच्या ४ सामन्यात एकूण २५२ रन्स केले. सर्वाधिक रन्स बनविणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे.