shreyas iyer: श्रेयस अय्यर IPL नंतर आता टी 20 वर्ल्ड कपमधूनही बाहेर?

श्रेयसला दुखापत झाल्यामुळे IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर द्यावी याचा पेट निर्माण झाला आहे.

Updated: Mar 27, 2021, 01:49 PM IST
shreyas iyer: श्रेयस अय्यर IPL नंतर आता टी 20 वर्ल्ड कपमधूनही बाहेर? title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिज सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यादरम्यान टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला उर्वरित दोन वन डे सामन्यादरम्यान आराम देण्यात आला. त्याऐवजी संघाच ऋषभ पंतला जागा देण्यात आली. 

श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. एक्स रे काढण्यात आला असून ऑपरेशन करावं लागू शकतं अशी बीसीसीआयच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सध्या श्रेयस अय्यरवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे श्रेयसला दुखापत झाल्यामुळे IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर द्यावी याचा पेट निर्माण झाला आहे.

श्रेयस अय्यर सध्या वन डे सीरिज आणि IPLचे सामने खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. यासोबतच टी 20 वर्ल्ड कपमधून देखील बाहेर पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टीम इंडियाचे माजी स्फोटक ओपनर विरेंद्र सेहवाग यांच्या मते श्रेयस अय्यरला जास्त आरामाची गरज असल्यानं तो काही काळ मैदानापासून लांब राहिल. त्यामुळे श्रेयस अय्यर टी 20 वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही त्यांनी बांधला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर दिली जाईल असा दावा त्यांनी केला आहे.