Shubman Gill ने स्वतःच्या चुकीचं खापरं फोडलं पुजारावर; पुजारानेही लाईव्ह सामन्यात सुनावलं, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये टीमचा युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill Pujara Video) सिनियर खेळाडू चेतेश्वर पुजारावर संतापलेला दिसतोय. इतकंच नाही तर यावेळी पुजाराही शांत बसत नाही.

Updated: Mar 11, 2023, 05:37 PM IST
Shubman Gill ने स्वतःच्या चुकीचं खापरं फोडलं पुजारावर; पुजारानेही लाईव्ह सामन्यात सुनावलं, व्हिडीओ व्हायरल title=

Shubman Gill Pujara Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावस्कर सिरीजचा (Border Gavaskar Trophy) चौथा सामना अहमदाबाच्या स्टेडियमवर खेळवण्यात येतोय. हा सामना जिंकून ही संपूर्ण सिरीज जिंकण्याचा प्रयत्न टीम इंडिया (Team India) करणार आहे. या सामन्यात पहिले दोन दिवस ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. मात्र तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार शुभमन गिलने खणखणीत शतक मारत भारताचं वर्चस्व दाखवून दिलंय. 

या सामन्यात भारताच्या पहिल्या डावामध्ये शुभमन गिलने शतक झळकावलं खरं. मात्र त्याची त्याच्या एका चुकीची शिक्षा त्याला चांगलीच महागात पडण्याची शक्यता होती. यावेळी शुभमनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

पुजारावर संतापला शुभमन गिल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये टीमचा युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill Pujara Video) सिनियर खेळाडू चेतेश्वर पुजारावर संतापलेला दिसतोय. इतकंच नाही तर यावेळी पुजाराही शांत बसत नाही. पुजाराने देखील गिलला भर मैदानात फटकार लगावली आहे. 

भर मैदानात पुजारा आणि गिलमध्ये वाजलं

भारताचा कर्णधार रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. यावेळी पुजारा आणि शुभमन गिलमध्ये अशी एक वेळ आली होती, ज्यावेळी ते दोघं जवळपास भिडले होते. टीम इंडियाच्या डावाची 33 वी ओव्हर सुरु होती. यावेळी मिचेल स्टार्कच्या बॉलवर पुजाराने मिड ऑनच्या बाजूला एक उत्तम शॉट खेळला. 

पुजाराचा हा शॉट बाऊंड्री लाईनजवळ गेला खरा, मात्र ट्रेविस हेडने उत्तम डाईव्ह मारून फोर अडवली. यावेळी ट्रेविस हेडने बॉल स्टार्ककडे फेकला. यावेळी शुभमन गिल नॉन स्ट्रइकर एंडवरून तिसरा रन घेण्यासाठी धावला. यावेळी शुभमनने अर्ध क्रीज पार देखील केलं हातो. मात्र यावेळी पुजाराने मात्र रन घेण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत गिलने डाईव्ह मारून स्वतःची विकेट वाचवली. या प्रकरणानंतर गिल चांगलाच संपताला आणि पुजाराला रागाच्या भरात बोलून गेला. यादरम्यान दोघांमध्येही चांगलीच वादावादी झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

टीम इंडिया मजबूत स्थितीत

चौथ्या सामन्यामध्ये तिसऱ्या डावाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडिया मजबूत स्थितीत दिसून येतेय. भारताने 3 विकेट्स गमावले असून 289 रन्सवर खेळतेय. शुभमन गिलच्या शतकी खेळीने टीम इंडियाला मोठा फायदा झाला. भारत अजून 191 रन्स पिछाडीवर आहे. रोहित शर्माने 35, शुभमन गिल 128, चेतेश्वर पुजारा 42 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतलेत. तर क्रीजवर सध्या विराट कोहली आणि रविंद्र जडेजा आहेत. विराटने उत्तमरित्या अर्धशतक झळकावलं आहे.