Shubman Gill Sara Tendulkar Viral Photo During World Cup 2023: भारतीय संघातील स्फोटक फलंदाज शुभमन गिल हा कायमच चर्चेत असतो. वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या 2 सामन्यांना मुकलेल्या शुभमन गिलला आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नसली तरी सोशल मीडियावर तो मैदानातील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील गोष्टींमुळेही चांगलाच चर्चेत असतो. सध्या त्याचा आणि सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा असाच एका फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वर्ल्ड कप सुरु असतानाच सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल लपूनछपून भेटले की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र या फोटोमागील सत्य आता समोर आलं आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये भारताचा स्टार फलंदाज शुभमन गील हा खुर्चीवर बसलेला दिसत आहे. तर त्याच्या मागे उभ्या असलेल्या सारा तेंडुलकरने त्याच्या गळ्यात हात घालून गालाला गाल लावून स्माईल देताना दिसत आहे. दोघांच्या भेटीदरम्यान हा फोटो काढण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरील अनेक अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या पोस्टमध्ये केला गेला आहे. सध्या भारतात सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये शुभमन भारतीय संघातील सलामीवीर म्हणून खेळत आहे. अशातच या दोघांच्या या कथीत भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. अशीच एक व्हायरल फोटो पोस्ट खाली पाहा...


सोशल मीडियावर अनेकदा सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचं नाव एकमेकांबरोबर जोडलं जातं. अनेकदा मैदानावरही शुभमन गिल बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करत असतानाचा चाहते साराच्या नावाने घोषणाबाजी करतात असंही दिसून आलं आहे. या दोघांनी कधीही यासंदर्भात उघडपणे भाष्य केलेलं नाही. मात्र चाहत्यांमध्ये या दोघांबद्दल कायमच वेगवेगळ्या जर तरच्या स्वरुपातील चर्चा सुरु असतात. शुभमनच्या मैदानावरील कामगिरीनंतर अनेकदा सोशल मीडियावर सारा तेंडुलकरचं नाव चर्चेत येतं. त्याचप्रमाणे सध्या या दोघांचा हा खोटो, मॉर्फ केलेला फोटो चर्चेत आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.