आयपीएलच्या 15 व्या मोसमादरम्यान स्टार क्रिकेटरचा निवृत्तीचा निर्णय

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार सुरु आहे. आतापर्यंत या मोसमात यशस्वीपणे 14 सामन्यांचं आयोजन केलं गेलंय. या दरम्यान एका मोठ्या क्रिकेटपटूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Apr 7, 2022, 04:59 PM IST
आयपीएलच्या 15 व्या मोसमादरम्यान स्टार क्रिकेटरचा निवृत्तीचा निर्णय title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार सुरु आहे. आतापर्यंत या मोसमात यशस्वीपणे 14 सामन्यांचं आयोजन केलं गेलंय. या दरम्यान 4 वेळा वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या एका मोठ्या क्रिकेटपटूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या स्टार क्रिकेटरने तडकाफडकी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. (south africa mignon du preez announced retirment from odi and test cricket)

दक्षिण आफ्रिकेची 32 वर्षीय महिला क्रिकेटपटू डु प्रीजने ( mignon du preez) निवृत्ती जाहीर केली आहे. कुटुंबियांना अधिक वेळ देता यावा आणि टी 20 क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रीत करता यावं, या उद्देशाने डु प्रीजने हा निर्णय घेतला आहे.
 
डु प्रीजने 154 एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. डु प्रीज 2014 मध्ये टीम इंडिया विरुद्धच्या एका कसोटी सामन्यात खेळला होता.

डु प्रीज काय म्हणाली?

"मला आतापर्यंत एकूण 4 वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं भाग्य लाभलं. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं आणि अविस्मरणीय अशी आठवण आहे. आता मी उर्वरित वेळ कुटुंबियांसोबत घालवणार आहे", असं डु प्रीज म्हणाली.

डु प्रीजची क्रिकेट कारकिर्द

डु प्रीजने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केलं होतं. डु प्रीजने खेळलेल्या 154 एकदिवसीय सामन्यांपैकी 46 सामन्यात आफ्रिकेचं नेतृत्व केलं  होतं.