केपटाऊन : दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया आपसात भिडण्यासाठी तयार आहेत. दोन्ही संघ ५ जानेवारीपासून पहिल्या कसोटी सामन्यात आमनेसामने असणार आहेत.
केपटाऊनच्या जमीनीवर होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीममध्ये १५ खेळाडूंचा समावेश आहे. टीमचे नेतृत्त्व फॉफ डू प्लेसीकडे आहे. तर संघात आणखी एका मोठ्या चेहऱ्याचे पुनरागमन झाले आहे.
जलद गती गोलंदाज डेल स्टेन बऱ्याच काळापासून टीमधून बाहे होता साधारण एक वर्षांनंतर त्याला संघात स्थान मिळाले आहे.
ऑल राउंडर क्रिस मॉरिस जखमी झाल्याने तो संघातून बाहेर होता. पण पहिल्या टेस्टपूर्वी तो फीट झाला आहे. त्याला जलद गती गोलंदाज डुएन ओलिव्हरच्या जागी संघात स्थान मिळाले आहे.
टीमची घोषणा झाली आहे, पण संघातील काही खेळाडू अजूनही फिटनेसच्या बाबतीत संशयाच्या घेऱ्यात आहे. संघाचा कर्णधार डु प्लेसी व्हायरल फिव्हरमुळे झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटीत खेळला नाही. तसेच झिम्बाब्वे विरूद्धच्या कसोटी डी कॉक जखमी झाला होता. असे म्हटले जाते की हे तिन्ही खेळाडू भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी फिट होतील.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहचली आहे. त्यांना प्रॅक्टीस मॅचची संधी नाही. संघ थेट पहिल्या कसोटीत मैदानात उतरणार आहेत.
फाफ डु प्लेसी, हाशिम अमला, टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक, डी ब्रून, एबी डिविलियर्स, डीन एल्गर, केशव महाराज, एडन मार्कराम, मॉर्ने मॉर्कल, क्रिस मॉरिस, एंडेले फेलुकवायो, वेरनॉन फिलेंडर, कागिसो रबाडा और डेल स्टेन.