तो क्लासमेट क्रिकेटर तिला ज्या कारणामुळे आवडायचा नाही, त्याच कारणाने पुन्हा तिला आवडायला लागला

एका प्रेमाची ही गजब कहाणी एका भारतीय क्रिकेटरच्या आयुष्यातील आहे

Updated: Jun 10, 2021, 06:51 PM IST
तो क्लासमेट क्रिकेटर तिला ज्या कारणामुळे आवडायचा नाही, त्याच कारणाने पुन्हा तिला आवडायला लागला

मुंबई : लहानपणीचे प्रेम कोणीच विसरत नाही. काही कारणामुळे ते प्रेम अपूर्ण राहते. तर असे फार कमी लोकं असतात ज्यांचे प्रेम पूर्ण होते. अशी एका प्रेमाची ही गजब कहाणी एका भारतीय क्रिकेटरच्या आयुष्यातील आहे. हा क्रिकेटर आहे, रवीचंद्रन अश्विन. जो लहान असल्यापासून खूप मस्ती खोर होता. तो वर्गात खूप कमी परंतू वर्गा बाहेर जास्त असायचा. याच कारणामुळे त्याला आवडत असणाऱ्या मुलीला तो आवडायचा नाही, पण अखेर जे नशिबात असतं तेच घडतं. शेवटी त्याच मुलीसोबत त्याचे लग्न झालं.

प्रीती नारायणन असे रवीचंद्रन अश्विनच्या बायकोचे नाव आहे. आर अश्विन आणि प्रीती लहानपणापासून एका शाळेत शिकत होते. परंतु दोघे ही एकमेकांना ओळखायचे नाही. कारण ते वेगवेगळ्या वर्गात होते. नंतर आठवीला ते दोघेही एका वर्गात आले. प्रीतीला पाहताचक्षणी आर अश्विनला ती आवडू लागली, परंतु प्रीतीला अश्विन आवडायचा नाही.

कारण तो कधी वर्गात बसायचा नाही, त्याच बरोबर तो खूप खट्याळ आणि मस्तीखोर होता. आर अश्विनला प्रीती आवडते, ही गोष्ट सगळ्यांना माहित होती. परंतु  प्रीतीने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर दोघे कामानिमीत्त एकमेकांशी बोलायला लागले.

शालेय आयुष्य संपल्यानंतर दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकायला गेले. तेथे त्या दोघांचे प्रेम झाले. खरेतर त्याच्या आयुष्यात हे घडलं ते फिल्मी पद्धतेने. फिल्मी पद्धत यासाठी कारण आर अश्विनने कॅमप्लास्ट क्रिकेट मैदानावर प्रीतीला बोलावले आणि तिला लग्नासाठी प्रपोज केले.

यात आश्चर्यकारक गोष्ट अशी की, प्रीतीला अश्विन आवडायचा नाही त्याचे कारण होते की, मैदान. परंतू मैदानातच जाऊन अश्विनने तिला प्रपोज केले आणि दोघांचे लग्न जमले.

त्या दोघांच्या ही घरच्यांना त्यांच्याबद्दल माहिती होती.  त्यांनाही या दोघांना साथ दिली. त्यानंतर आर अश्विन आणि प्रीती 2013मध्ये लग्न बंधनात अडकले. त्या दोघांना दोन लहान मुली आहेत.