खराब कामगिरीनंतर Kane Williamson कडून कर्णधारपद काढून घेणार?

केन विलियम्सन कर्णधारपद सोडणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Updated: May 9, 2022, 03:39 PM IST
खराब कामगिरीनंतर Kane Williamson कडून कर्णधारपद काढून घेणार? title=

मुंबई : यंदाच्या सुरु असलेल्या आयपीएल 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनकडून काही खास कामगिरी झालेली दिसली नाही. गेल्या सामन्यांमध्ये त्याचा सतत खराब फॉर्म पहायला मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर बंगळूरूविरूद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. दरम्यान यानंतर केन विलियम्सन कर्णधारपद सोडणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

चेन्नईविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघाची खराब कामगिरी पाहायला मिळाली ज्यामध्ये हैद्राबादच्या ओपनरला चेन्नईविरुद्ध खातंही उघडता आलं नाही. अशा परिस्थीतीमध्ये टीमला विजेतेपद मिळवून देण्याची मोठी जबाबदारी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनवर होती पण तो स्वत: चांगली कामगिरी करण्यात पुर्णपणे अपयशी ठरत आहे.
 
केन विलियम्सन 100 पेक्षा कमी स्ट्राईकरेटने रन काढणारा एकमेव खेळाडू आहे. 11 डावातील खेळानंतर तो 20 पेक्षा कमी  सरासरीने फलंदाजी करत आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यातही केन विलियमसन रन आऊट झाला होता. त्यामुळे त्याच्या खराब फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभं राहातंय.

मुख्य प्रशिक्षकांची दिली मोठी प्रतिक्रिया

यावर हैदराबादचे हेड कोच टॉम मूडी म्हणाले की, बंगळूरूविरूद्धच्या सामन्यात केनला एकंही चेंडू खेळता आला नाही. मात्र यावरून त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. तो एक वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. या सिजनसध्ये तो नक्कीचं योग्य कामगिरी करेल. 

टॉम मूडी पुढे म्हणाले, आम्हाला वाटलं होतं, त्रिपाठी, एडन मारक्रम आणि निकोलस पूरन फलंदाजीसाठी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर उतरले तर ते टीमसाठी योग्य ठरेल.