मुंबई : श्रीलंकेच्या क्रिकेटर धनुष्का गुणतिलका याच्या मित्रावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. नॉर्वेच्या एका महिलेने हा आरोप केला आहे. महिलेच्या आरोपानंतर गुणतिलकावर सर्वच सामन्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. धनुष्का आणि त्याचा मित्र नॉर्वेच्या 2 महिलांना रविवारी सकाळी त्या हॉटेलमध्ये घेऊन आले ज्या हॉटेलमध्ये श्रीलंकेची टीम थांबली आहे. या महिलेने या नंतर क्रिकेटरच्या मित्रावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. तो मुळचा श्रीलंकेचा असून त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी सुरु आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. नॉर्वेच्या एका महिला पर्यटकाने धनुष्काच्या मित्रावर आरोप केले आहेत पण धनुष्का गुणतिलकावर कोणतेही आरोप नाही आहेत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डने म्हटलं की, चौकशी पूर्ण होईपर्यंत 27 वर्षाचा खेळाडू धनुष्काला सर्व फॉरमॅटमधून सस्पेंड करण्यात येत आहे. पण सध्या सुरु असलेल्या सामन्यात तो खेळू शकतो. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला सामन्यासाठी मिळणारी फी देखील नाही दिली जाणार.
क्रिकेट नियमानुसार सामन्यादरम्यान खेळाडूंना रात्रीच्या वेळी हॉटेलच्या रुमबाहेर जाण्याची परवानगी नसते. नातेवाईक किंवा पाहुण्यांना यावेळी हॉटेल रुममध्ये आणण्याची मनाई असते.