आता श्रीलंकेचा हा दिग्गज हार्दिक पांड्याचा फॅन... जाणून घ्या का...

 आपला जबरदस्त फॉर्म आणि कामगिरीमुळे सध्या हार्दिक पांड्या  क्रिकेट जगतात एक सेन्सेशन बनला आहे. दररोज त्याच्या प्रशंसकांमध्ये वाढ होत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 25, 2017, 08:56 PM IST
आता श्रीलंकेचा हा दिग्गज हार्दिक पांड्याचा फॅन... जाणून घ्या का...  title=

नवी दिल्ली :  आपला जबरदस्त फॉर्म आणि कामगिरीमुळे सध्या हार्दिक पांड्या  क्रिकेट जगतात एक सेन्सेशन बनला आहे. दररोज त्याच्या प्रशंसकांमध्ये वाढ होत आहे. 

त्याच्या फॅनमध्ये सामान्यांपासून क्रिकेट जगतातील दिग्गजांचा समावेश आहे. या लिस्टमध्ये आता श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारा  याचाही समावेश झाला आहे.

रविवारी ऑस्ट्रेलियाविरूद्ध शानदार खेळी करताना ७२ चेंडूत ७८ धावा केल्या. 

 

संगकारा याने आपल्या ट्विटममध्ये हार्दिक पांड्याला स्पेशल प्लेअर म्हटले आहे. भारतीय संघ आता कोणत्याही परिस्थिती खेळायला तयार झाला आहे असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याच्या या ट्विटवर पांड्याने त्वरित उत्तर देत संगकाराला धन्यवाद दिले आहे. 

यापूर्वी पांड्याने श्रीलंकेतही कमालीची फलंदाजी केली होती.