Steve Smith: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉर्डर-गावस्कर सिरीजचा (Border Gavaskar Trophy) शेवटचा सामना खेळवला जातोय. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलिया टीमसाठी चांगला फायदेशीर ठरला. लंचब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 विकेट गमावून 75 रन्स केले होते. अशातच यामध्ये एक अशी घटना घडली, ज्यामध्ये कांगारूंचा कर्णधार स्टीव स्मिथ (Steve Smith) चांगलाच संतापला होता.
स्टीव स्मिथ (Steve Smith) इतका संतापला होता की, यामध्ये रोहित शर्माला येऊन मध्यस्ती करावी लागली. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अंपायर या दोघांनी मिळून स्मिथला शांत केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कांगारू टीमचा कर्णधार पॅट कमिंट वैयक्तिक कारणामुळे तिसऱ्या आणि चौथ्या टेस्टमधून बाहेर गेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा स्टिव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली आहे. अशातच चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया मैदानावर उतरली असता स्मिथ 2 रन्सवर नाबाद खेळत होताय यावेळी फलंदाजी करत असताना गोलंदाजी एंडकडून स्क्रिनवरून पडदा सतत दूर होत होता. ज्यामुळे स्मिथ फलंदाजीमध्ये लक्ष केंद्रीत करू शकत नव्हता.
इतक्या छोट्या गोष्टीवरून स्टिव्ह स्मिथ संतापला होता आणि लाईव्ह सामन्यामध्येच त्याने संताप व्यक्त केला. गोलंदाजी करणाऱ्या शमीने मैदानावर असलेल्या कर्मचाऱ्याला पडदा नीट करण्यास सांगितलं. तर त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा स्मिथजवळ पोहोचला आणि त्याच्याशी बोलून त्याला समजावू लागला. मात्र यावेळी काही वेळाकरता सामना रोखण्यात आला होता. अखेर रोहित आणि अंपायरच्या समजवल्याने स्मिथ शांत झाला.
Australia walo ke nakhre or drame dekho.... pic.twitter.com/vFzU8AYR5Y
— javed ansari (@javedan00643948) March 9, 2023
अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या टेस्ट सामन्यात मोठे निर्णय घेत रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिलसह टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसणार आहे आहे. चौथ्या टेस्टमधून पुन्हा एकदा के.एल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी फायदेशीर ठरल्याचंही दिसून आलं.