कोहलीच्या बॉलिंगची स्टिव्ह स्मिथने उडवली खिल्ली!

 कांगारू फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही गोलंदाजीसाठी विराट कोहलीची खिल्ली उडवली.

Updated: Oct 21, 2021, 12:00 PM IST
कोहलीच्या बॉलिंगची स्टिव्ह स्मिथने उडवली खिल्ली! title=

मुंबई : टी -20 वर्ल्डकपपूर्वी भारताने आपल्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दरम्यान या सामन्यातील एक मजेदार क्षणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात विराट कोहली ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गोलंदाजी करताना दिसला. यावेळी कांगारू फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही गोलंदाजीसाठी विराट कोहलीची खिल्ली उडवली. आणि हा व्हीडिओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होतोय. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सराव सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होता. सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीकडे गोलंदाजी दिली. विराट कोहली बऱ्याच काळानंतर गोलंदाजी करताना चाहत्यांना दिसला.

स्टीव्ह स्मिथने कोहलीच्या गोलंदाजीची उडवली खिल्ली

पहिल्या पॉवरप्लेनंतर कोहलीने गोलंदाजी केली. कोहलीची अनोखी गोलंदाजी अॅक्शन पाहून स्टीव्ह स्मिथ हैराण होता. क्रिझवर असलेल्या स्मिथने कोहलीचा पहिला चेंडू चुकवला. त्याचवेळी, स्मिथने सिंगल रनसाठी लाँग-ऑफच्या दिशेने एक शॉट खेळला. त्यावेळी स्मिथने एक मजेदार प्रतिक्रिया दिली.

स्मिथच्या रिएक्शनमुळे प्रेक्षकही हैराण

स्मिथ कोहलीच्या अनोख्या आर्म बॉलिंग अॅक्शनची नक्कल करताना दिसला. सामन्यादरम्यान स्मिथ कोहलीच्या कृतीचं अनुकरण करतो आणि स्वतःवर हसताना दिसतोय.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 5 बाद 152 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 17.5 षटकांत 153 धावा करत सामना जिंकला.