IND Vs SL: पिंक बॉल टेस्टदरम्यान अचानक मधमाशांचा हल्ला

कालच्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वीच खेळात एक मोठा व्यत्यत आल्याचं दिसून आलं. 

Updated: Mar 14, 2022, 09:10 AM IST
IND Vs SL: पिंक बॉल टेस्टदरम्यान अचानक मधमाशांचा हल्ला title=

मुंबई : भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा टेस्ट सामना बंगळूरूच्या मैदानावर खेळला जातोय. काल या सामन्याचा दुसरा दिवस होता. मात्र कालच्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वीच खेळात एक मोठा व्यत्यत आल्याचं दिसून आलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु करण्यासाठी जेव्हा खेळाडू मैदानावर आले तेव्हा चक्क मधमाश्यांनी हल्ला केला. 

अचनाक भरपूर मधमाशा मैदानावर आल्याने एकंच गोंधळ उडाला. यावेळी काही काळासाठी सामना देखील थांबला होता. 

जेव्हा श्रीलंकेचे फलंदाज क्रीझवर आले, तेव्हा समोरच्या साईट स्क्रीनजवळ काही हालचाल जाणवली. श्रीलंकेच्या खेळाडूंच्या ही हालचाल तातडीने लक्षात आली. जेव्हा कॅमेऱ्याची नजर त्याठिकाणी गेली त्यावेळी साईट स्क्रीनजवळ मधमाशांचा थवा दिसला. जो सतत वर येताना दिसत होता.

मैदानावर अचानक बऱ्याच मधमाशा आल्याने 3 ते 4 मिनिटांचा खेळ थांबला होता. दरम्यान बंगळूरूमध्ये सुरु असलेल्या दूसऱ्या टेस्ट सामन्यावर टीम इंडियाची चांगली पकड आहे. टीम इंडिया अवघ्या 9 विकेट्सने विजयापासून दूर आहे. 

टीम इंडियाकडे दुसऱ्या डावात 143 धावांची आघाडी होती. तर दुसरा डाव हा 9 बाद 303 धावांवर घोषित केला. यामुळे लंकेला विजयासाठी 447 धावांच तगडं आव्हान मिळालं आहे. मात्र लंकेला आता विजयासाठी 419 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे टीम इंडियाने या सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. त्यामुळे आजचं या सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.