मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या बॅटींगपेक्षा टीकांमुळे जास्त लक्ष होतोय. टीम इंडियाच्या माजी क्रिकेटर्सनी तर त्याची शाळाचं सुरु केलीय. जो तो येतोय तो त्याच्यावर टीका करू लागलाय. त्यात आता एका माजी क्रिकेटरने मात्र विराटला पाठींबा दिलाय. त्यामुळे विराटसाठी काहीसा दिलासा आहे.
कपिल देव पासून वेंकटेश प्रसाद (venkatesh prasad) पर्यंत अशा अनेक खेळाडूंच्या टीकांनी विराट सध्या चर्चेत असताना आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करने त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
'जेव्हा रोहित शर्मा धावा करत नाही, तेव्हा कोणी बोलत नाही, किंवा जेव्हा दुसरा फलंदाज धावा करत नाही तेव्हा कोणी बोलत नाही, असे विधान करत गावस्कर यांनी एकप्रकारे विराटचा बचाव केल्याचे बोलले जात आहे. ते पुढे म्हणतात, तुम्ही फक्त फॉर्मबद्दल बोलत आहात, आता संघ ज्या प्रकारे खेळत आहे, त्यात काही वेळा अपयशी होऊ शकतात,असेही त्यांनी म्हणत विराटची पाठराखणच केली आहे.
सुनील गावसकर पुढे म्हणाले की, विश्वचषकासाठी संघ जाहीर व्हायला अजून दोन महिने आहेत. निवड समिती तुमच्यासोबत आहे आणि संघ जाहीर करण्यापूर्वी सर्व गोष्टींची चाचपणी केली जाईल. त्यावर आतापासून बोलणे योग्य नाही, तसेच थोडा वेळ दिला पाहिजे,असे गावस्कर यांनी सांगितले.
दरम्यान प्रत्यक्षरीत्या गावस्कर यांनी विराटचं नाव जरी घेतलं नसलं तरी असे विधान करून त्याची पाठराखण केली आहे.