IPLच्या पहिल्याच टप्प्यात Sunrisers Hyderabad ला झटका, हा दिग्गज खेळाडू बाहेर

ज्याची इत्यक्या दिवसापासून सर्वांना प्रतीक्षा होती, तो आयपीएल 2022 सुरू झाला आहे. सगळ्या टीम, नवीन खेळाडू आणि नव्या रणनितीसह सज्जं झाले आहेत. एवढेच काय तर त्यांची फान देखील नवा खेळ पाहाण्यासाठी सज्ज आहेत. मात्र त्याआधीच सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक बलाढ्य फलंदाज आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. ज्याचा परिणाम टीम आणि त्याच्या खेळावर होणार आहे.

Updated: Mar 29, 2022, 09:19 PM IST
IPLच्या पहिल्याच टप्प्यात Sunrisers Hyderabad ला झटका, हा दिग्गज खेळाडू बाहेर title=

मुंबई : ज्याची इत्यक्या दिवसापासून सर्वांना प्रतीक्षा होती, तो आयपीएल 2022 सुरू झाला आहे. सगळ्या टीम, नवीन खेळाडू आणि नव्या रणनितीसह सज्जं झाले आहेत. एवढेच काय तर त्यांची फान देखील नवा खेळ पाहाण्यासाठी सज्ज आहेत. मात्र त्याआधीच सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक बलाढ्य फलंदाज आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. ज्याचा परिणाम टीम आणि त्याच्या खेळावर होणार आहे.

हा खेळाडू बाहेर

सनरायझर्स हैदराबादला आयपीएल 2022 मधील पहिला सामना आज (29 मार्च) राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचा आहे. त्याआधीही सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्स आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला आहे.

सनरायझर्स हैदराबादने या फलंदाजाला 1.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेते होते. परंतु ग्लेन फिलिप्स हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहेत. या कारणास्तव तो भारतात रवाना झालेला नाही.

न्यूझीलंडचा मजबूत यष्टीरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्सने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांना ही माहिती शेअर केली. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, 'जे विचारत आहेत त्यांच्यासाठी - पॉझिटिव्ह पीसीआर (कोविड -19) चाचणीमुळे मी न्यूझीलंडमध्ये अडकलो आहे, मी शक्य तितक्या लवकर SRH मध्ये सामील होणार आहे.'

सनरायझर्स हैदराबादने यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नसली तरी, ग्लेन फिलिप्सने मात्र आपल्या चाहत्यांना त्याच्या न खेळण्या मागचं कारण स्पष्ट केलं आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला होता. त्यानंतर संघाला विजेतेपदाच्या उंबरठा गाठता आलेला नाही. 2018 मध्ये संघ उपविजेता ठरला होता. 
यावेळी सनरायझर्स हैदराबादची कमान केन विल्यमसनच्या हाती होती आणि हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे देखील दिसत होते. त्याची गोलंदाजी खूपच मजबूत दिसत आहे. सनरायझर्स हैदराबादकडे भुवनेश्वर कुमारसारखा गोलंदाज आहे, जो कोणत्याही फलंदाजीच्या क्रमाला उद्ध्वस्त करू शकतो.