मुंबई : मोठ्या अंतरानंतर यूएईमध्ये सुरु झालेल्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे बीसीसीआय (BCCI)आणि आयपीएल (IPL) मॅनेजमेंटच्या चिंता वाढल्या आहेत. सनराइजर्स हैदराबादचा खेळाडू कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले 6 खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत.
Sunrisers Hyderabad player T Natarajan tested positive for #COVID19 at a scheduled RT-PCR test. The player has isolated himself from the rest of the squad. He is currently asymptomatic. The medical team has also identified 6 close contacts of the player: Indian Premier League pic.twitter.com/Jbzfd5iDJK
— ANI (@ANI) September 22, 2021
सनरायझर्स हैदराबादचा आज संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. मात्र, आजच्या सामन्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. सामना खेळला जाणार आहे.
सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आरटी-पीसीआर चाचणीमध्ये हा निकाल आला आहे जो सामना सुरू होण्यापूर्वी केला जातो. यानंतर त्याच्या संपर्कात आलेले खेळाडू आणि कर्मचारी यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
ज्या सदस्यांना वेगळे करण्यात आले आहे त्यात विजय शंकर (खेळाडू), विजय कुमार (टीम मॅनेजर), श्याम सुंदर (फिजिओ), अंजना वन्नन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक मॅनेजर), गणेशन ( गोलंदाज) यांचा समावेश आहे.
उर्वरित टीम मेंबर्स आणि स्टाफवर RT-PCR टेस्ट देखील करण्यात आली आहे, ज्यामध्ये सर्वांचा निकाल निगेटिव्ह आला आहे.
आयपीएलच्या या हंगामाच्या सुरुवातीलाही कोरोनाचे प्रकरणे समोर आल्यानंतर भारतात सुरु असलेली आयपीएल काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएल पुन्हा सुरू करण्यात आले. आता दोन दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचे प्रकरण समोर आले आहे.