IPL Final च्या सामन्यादरम्यान बिर्याणीसह Condom चीही ऑर्डर; Swiggy ने शेअर केली यादी; म्हणाले "आज रात्री बरेच खेळाडू..."

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय घातल्याने सामना मध्यरात्रीपर्यंत चालला. सामन्याचा निकाल पाहण्यासाठी प्रेक्षकांनी रात्री 1.45 पर्यंत वाट पाहावी लागली. दरम्यान यावेळी घरी सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांनी Swiggy वरुन कोणत्या गोष्टींची ऑर्डर केली ती यादी शेअर करण्यात आली आहे. ही यादी पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.   

शिवराज यादव | Updated: May 30, 2023, 05:32 PM IST
IPL Final च्या सामन्यादरम्यान बिर्याणीसह Condom चीही ऑर्डर; Swiggy ने शेअर केली यादी; म्हणाले "आज रात्री बरेच खेळाडू..." title=

Swiggy Ordered List of CSK vs GT Final: जर तुम्ही आयपीएल (IPL), क्रिकेटचे (Cricket) चाहते असाल तर सोमवारी रात्री किती थरार घडला हे वेगळं सांगण्याची गरज नाही. चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात झालेला हा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना कोण जिंकणार याचा अंदाज येत नव्हता. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 214 धावांचा डोंगर उभा केला होता. पण पावसाने व्यत्यय आणल्याने डकवर्थ लुईसनुसार (DLS) हे टार्गेट 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आणि अखेरच्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) चौकार लगावत चेन्नईला पाचव्यांदा आयपीएलचा खिताब जिंकवून दिला. 

आयपीएलचा अंतिम सामना असल्याने संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच करोडो क्रिकेट चाहते टीव्हीला चिकटून बसले होते. महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यातील कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. पण चेन्नईचे फलंदाज मैदानात उतरल्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. यामुळे सामना थांबवावा लागल. नंतर पुन्हा सामना सुरु होण्यासाठी रात्रीचे 12.10 झाले होते. 

IPL Final: नेहमी टीका करणाऱ्या गौतम गंभीरकडूनही धोनीचं जाहीर कौतुक, म्हणाला "हे अविश्वसनीय..."

 

दरम्यान फूड डिलिव्हरी अॅप Swiggy ट्विटरला सामन्यादम्यान आणि सामन्यानंतर लोक कोणत्या पदार्थ, गोष्टींची ऑर्डर देतात याचे अपडेट्स देत असते. सोमवारीही सामना लांबल्याने लोकांनी स्विग्गीवर रात्रभर ऑर्डर दिल्याचं दिसत आहे. दही साखरेपासून ते बिर्याणी अशा अनेक गोष्टी रात्रभर लोक ऑर्डर करत होते. 

स्विग्गीने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 1 लाख 20 हजार लोकांनी आयपीएल फायनल पाहताना बिर्याणीची ऑर्डर दिली. ट्वीटमध्ये लिहिलं आहे की "सर्वाधिक ऑर्डर देण्यात आलेल्या पदार्थात बिर्याणीने या हंगामात ट्रॉफी जिंकली आहे. 1 लाख 20 हजार लोकांनी बिर्याणीची ऑर्डर दिली. एका मिनिटाला बिर्याणीच्या 212 ऑर्डर येत होत्या".

इतकंच नाही तर आयपीएलचा सामन्यात व्यत्यय आल्याने अनेकांनी यावेळी इतर गोष्टींमध्येही वेळ घालवल्याचं दिसत आहे. याचं कारण स्विग्गीने काही लोकांनी Durex ची ऑर्डर दिल्याची माहिती दिली आहे. 

Swiggy ने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, स्विग्गी इन्संट मार्टच्या माध्यमातून 2423 कंडोम्सची डिलिव्हरी करण्यात आली. असं दिसतंय की आज रात्री 22 पेक्षा जास्त खेळाडू खेळत आहे. 

याशिवाय काही संस्कारी लोकही स्विग्गीवरुन ऑर्डर देत होते असं दिसत आहे. कारण अनेकांनी दही, साखरेची ऑर्डर दिल्याची माहिती स्विग्गीने दिली आहे. दरम्यान या पूर्ण हंगामात एकूण 3 लाख 68 हजार 353 जलेबी फाफड्याच्या आर्डर दिल्याची माहिती स्विग्गीने दिली आहे.