मुंबई : आयपीएलच्या टी-२० क्रिकेटसाठी ख्रिस गेलवर दोन वेळा खरेदी केले गेले नाही. बोली न लागल्याने मुंबईकडून खेळणारा गेल कोणत्याच टीममध्ये नव्हता. मात्र वीरेंद्र सेहवागचा सल्ला अभिनेत्री प्रीती झिंटा हिने मानला आणि गेलाला पंजाब संघात घेतले. गेलने तुफान बॅटिंग करुन पंजाबला दोन सामने आरामात जिंकून दिले आणि टीकाकारांनी आपल्या बॅटने उत्तर दिलेय.
क्रिकेटमध्ये ज्यांना संधी मिळते त्यांनी त्या संधीचे सोने केले तर काय होते हे पंजाबने चांगलेच अनुभवले आहे. ख्रिस गेलला पंजाबने संधी दिली आणि त्यांना दोन सामने सहज जिंकता आलेत. यात गेलचा मोठा वाटा आहे. गेलने पहिला दोन सामन्यांत १७५ रन्स केल्यात. यात त्याचे झंझावती नाबाद शतक आहे. त्याला फ्लेअर ऑफ द मॅचने दोन्ही सामन्यात गौरविण्यात आले.
गेलची कामगिरी चांगली झाली आहे. मात्र, आयपीएलमध्ये त्याच्यावर बोली लावण्यास तयार नव्हते. दोन्ही लिलावात कोणीही बोली लावलेली नाही. त्यामुळे प्रीती झिंटाने लिलावाच्या मूळ किमतीला ख्रिस गेलला खरेदी केले. प्रीतीने बोली लावल्यानंतर त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही. गेलचा आयपीएलमध्ये रिकॉर्ड खराब नव्हता तो चांगला होता. गतवर्षी एका डावात त्याने १६७ रन्स बनविले होते. त्याचा आयपीएलमधील एक विक्रम होता. त्याने २५० पेक्षा जास्त षटकार ठोकलेत. पंजाब टीमचा सदस्य वीरेंद्र सेहवागने ख्रिस गेलला अंतिम क्षणी खरेदी करण्यास सल्ला दिला. तो एक चांगला खेळाडू आहे. तो विरोधी टीमच्या गोलंदाजीवर तुटून पडू शकतो, त्यामुळे सामने जिंकणे सोपे जाईल, असा सल्ला दिला.
सेहवागने ख्रिस गेलबाबत वर्तविलेला अंदाज अचूक ठरला. पहिल्या दोन सामन्यात खेळायला मिळाले नाही. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याने आपल्याला सिद्ध केले. आयपीएलमध्ये किती मोठा खेळाडू आहे हे त्याने दाखवून दिले.