मुंबई : टीम इंडियाचा माजी सलामावीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) एका कृतीवरुन संताप व्यक्त केला आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेतील (T 20 world cup 2021) दुसरी सेमी फायनल मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) यांच्यात खेळवण्यात आली. या सामन्यात मोहम्मद हाफीजने टाकलेल्या दोन टप्पा चेंडूवर वॉर्नरने क्रीझच्या बाहेर येऊन सिक्स मारला. वॉर्नरच्या या कृतीवरुन गंभीरने संताप व्यक्त केला. (T 20 world cup 2021 pakistan vs australia semi final gautam gambhir criticized david warner over to hit six in double bounce ball)
तसेच ही कृती खेलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचंही गंभीरने म्हंटलं. सोबतच या मुद्द्यावरुन त्याने ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारांनाही सवाल विचारला आहे.
नक्की काय झालं?
दुसरी सेमी फायनल मॅचचं आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत होती. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 8 वी ओव्हर मोहम्मद हाफीज टाकायला आला.
ओव्हरमधील पहिलाच चेंडू त्याच्या हातातून निसटला. त्यामुळे चेंडू 2 टप्पा खाऊन क्रीझच्या बाहेर जात होती. ही बाब वॉर्नरच्या लक्षात आली. तितक्यात वॉर्नर क्रीझच्या लेग साईडच्या दिशेने पुढे येत तो चेंडू सीमारेषेपार पाठवला. यावरुन वाद सुरु झाला.
फक्त गंभीरच नाही, तर सोशल माडियावरही ही कृती खेलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचं म्हंटलं जात आहे.
गंभीरचं ट्विट
गंभीरने या संदर्भात एक ट्विट केलं. यामध्ये त्याने फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला मेन्शन केलं. वॉर्नरचं हे कृत्य लाजीरवाणं असल्याचं गंभीर म्हणाला. आयसीसीच्या नियमांनुसार, पंचांनी या चेंडूला नो बॉल घोषित केलं. म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या खात्यात एकही चेंडू न गमावता 7 धावा जोडल्या गेल्या. वॉर्नरने काय करायचं आणि काय नाही, याबाबतचं स्वांतंत्र्य त्याला होतं. मात्र त्याने असं करायला नको होतं.
What an absolutely pathetic display of spirit of the game by Warner! #Shameful What say @ashwinravi99? pic.twitter.com/wVrssqOENW
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 11, 2021
गंभीर काय म्हणाला?
"शेन वॉर्न कमेंट करत असतो. प्रत्येक बाबतीत ट्विट करतो. रिकी पॉन्टिंग स्पिरीट ऑफ द गेमबाबत मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. आता ते याबाबतीत काय बोलणार", असा सवाल गंभीरने उपस्थित केला. तो स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या वेळेस तो बोलत होता.
अश्विन जेव्हा मंकडिंगद्वारे आऊट करतो, तेव्हा तेव्हा अनेक मोठ्या प्रतिक्रिया येतात. तर आज शेन वॉर्न वॉर्नरच्या या कृतीसाठी काय बोलू इच्छितात, कारण दुसऱ्यांबाबत बोलणं सोपं आहे. आपल्या खेळाडूंबाबत बोलणं फार अवघड आहे", अशा शब्दात गंभीरने संताप व्यक्त केला.
Like trails in gully cricket.
Only this one is real cricket, in the semifinal of a #T20WorldCup #Hafeez #Warner
— Anand Datla (@SportASmile) November 11, 2021