Video : 6,6,6,6,6,6...या स्टार क्रिकेटरने पुन्हा रचला इतिहास, कोण आहे दीपेंद्र?

T20 :  या 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. एकाच ओव्हरमध्ये त्याने एकामागोमाग 6 सिक्स ठोकले आहेत. नेपाळचा युवराज सिंग म्हणून ओळख निर्माण करणारा हा दीपेंद्र आहे तरी कोण?  

नेहा चौधरी | Updated: Apr 14, 2024, 12:51 PM IST
Video : 6,6,6,6,6,6...या स्टार क्रिकेटरने पुन्हा रचला इतिहास, कोण आहे दीपेंद्र? title=
T20 international Video this star cricketer made history again who is Dipendra Singh Airee world record

Who Is Dipendra Singh Airee : 24 वर्षांच्या या पठ्ठ्याने 8 चं महिन्यात पुन्हा एकदा विक्रम केला आहे. एका ओव्हरमधील 6 बॉल्सवर 6 सिक्सिक ठोकून त्याने विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. आम्ही बोलत आहोत नेपाळचा क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग ऐरी बद्दल. 8 महिन्यांपूर्वी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 9 बॉल्समध्ये त्याने हाफ सेंच्युरी करुन युवराज सिंगचा विश्वविक्रम मोडला होता. कतारमध्ये ACC पुरुष T20 प्रीमियर चषक स्पर्धा सुरु आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याने ही कामगिरी झळकवली आहे. दीपेंद्रने 21 बॉल्समध्ये 64 रन्स करुन शानदार खेळी करुन टीमला विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये त्याने दोन विकेटही घेतली. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणारा तो जगातील तिसरा आणि नेपाळचा पहिला क्रिकेटपटू ठरलाय. सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. (T20 international Video this star cricketer made history again who is Dipendra Singh Airee world record)

उजव्या हाताने बॅटिंग करणारा दीपेंद्र सिंग ऐरीचा जन्म 24 जानेवारी 2000 चा आहे. वयाच्या 17 व्या वर्षी 2018 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं. नेपाळाचा अष्टपैली खेळाडूमध्ये त्याची निवड होते शिवाय तो ऑफ ब्रेकही बॉलिंग करुन वर्षांचं लक्ष वेधतो. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दीपेंद्रने चीनमधील हांगझोऊमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत केवळ 9 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी झळकवली होती. हा विक्रम करुन त्याने युवराज सिंगचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 

दीपेंद्र 2016 मधील अंडर-19 वर्ल्डकपचाही एक भाग होता. क्रिकेटविश्वास तो त्याच्या पॉवर हिटिंग गेमसाठी ओळखला जातो. मैदानात बॅटिंग करण्यासाठी आल्यावर पहिल्याच बॉलपासून त्याची आक्रमक वृत्ती दिसते. त्याचे फक्त बॅटच बोलत नाही तर बॉलिंग आणि फिलिंगमध्येही तो तरबेज आहेत. 

हेसुद्धा वाचा - Video : 6,6,6,6,6...जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम

दीपेंद्र सिंग ऐरीचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर त्याने 55 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 896 धावा केल्यात. यामध्ये एक सेंच्युरी आणि 3 हाफ सेंच्युरी आहेत. तर दीपेंद्रची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या ही 105 एवढी आहे. तर दीपेंद्रच्या बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकूण सामन्यांमध्ये  गोलंदाजीत 38 खेळाडूंना आऊट केलंय. तर 60 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1560 रन्स करत एक सेंच्युरी आणि 9 हाफ सेंच्युरी आपल्या नावावर केली आहे. तर यामध्ये 33 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत.