Video : 6,6,6,6,6...जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम

DC vs LSG IPL 2024 :  दिल्ली कॅपिटल्सची पहिल्यांदाच लखनऊवर 6 विकेट्सनी मात केली आहे. या सामन्यात 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचा विक्रम मोडत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

नेहा चौधरी | Updated: Apr 13, 2024, 09:29 AM IST
Video : 6,6,6,6,6...जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम title=
DC vs LSG IPL 2024 Who is Jake Fraser McGurk 21 year old broke the record of de Villiers

DC vs LSG IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये अखेर दिल्ली कॅपिटल्सने आपलं खात उघडलं. लखनऊ  सुपर जायंट्सचा 6 विकेट्सनी पराभव केला. कुलदी‌प आणि जेक फ्रेझरच्या झंझावाती खेळीने लखनौ चितपट करण्यात दिल्लीला यश आलं. घरच्या मैदानात खेळताना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊने विजयासाठी 168 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आयपीएलचे आतापर्यंतचे सामने पाहता दिल्लीचा लखनऊविरोधात सलग तीन सामन्यात पराभव झाला होता. तर दुसरीकडे लखनऊनच्या 160 धावांच्या लक्ष्याला भेदण्यात दिल्ली हा पहिला संघ ठरला आहे. 

6,6,6,6,6...जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 

दिल्ली कॅपिटल्सला पहिला विजय मिळवून देण्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो जेक फ्रेझर मॅकगर्क. 21 वर्षांच्या या पठ्ठ्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि मैदान गाजवलं. पहिल्याच सामन्यात त्याने 35 बॉल्समध्ये 55 रन्स केले. यात त्याने 5 सिक्स आणि 2 फोर मारले. जेक फ्रेझर मॅकगर्कला साथ दिली कर्णधार ऋषभ पंत याने. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 77 रन्सची भागीदारी केली. पंतने 24 बॉल्समध्ये 41 रन्स ठोकले. 

जेक फ्रेझर मॅकगर्क हा त्याच्या झंझावती खेळीसाठी ओळखला जात असून लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने चांगलीच कामगिरी केली आहे. सर्वात कमी बॉल्समध्ये सेंचुरी ठोकण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केलाय. जेक फ्रेझर-मॅकगर्क यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये अवघ्या 29 बॉल्समध्ये सेंचुरी केली होती.  

एवढंच नाही ही सेंचुरी करुन त्याने दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सचाही विक्रम मोडला आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये अवघ्या 30 बॉल्समध्ये सेंचुरी केली होती. तर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने 31 बॉल्समध्ये सेंचुरी केली होती. तर जेक फ्रेझर-मॅकगर्कने दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना तस्मानियाविरुद्धात 38 बॉल्समध्ये 125 रन्स करुन हा विक्रम आपल्या नावावर केलाय. 

एवढ्या विक्रमानंतरही जेक फ्रेझर-मॅकगर्कला ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्याची संधी देण्यात आलेली नाही. तरदुसरीकडे लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 9 प्रथम श्रेणीचे सामने खेळले असून त्यात त्याने 309 रन्स केले आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमधील 16 मॅचमध्ये 437 रन्स केले आहेत. यात एक हाफ सेंचुरी आणि एक सेंचुरी त्याच्या नावावर आहे.