दुबई: अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या बॉलिंगच्या कौशल्य़ाने तंबुत धाडणाऱ्या पाकिस्तानचा गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांचा रडारवर आहे. पाकिस्तानचा हा गोलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांनाही हे मोठं आव्हान असणार आहे. मात्र टीम इंडियाचे फलंदाज त्याची मैदानात धुलाई करण्यासाठी तयार आहेत.
पावर प्लेमध्ये सर्वात जास्त रन करण्याकडे टीम इंडियाचं लक्ष्य असणार आहे. पाकिस्तानचा शाहिन अफरीदी वेगवान गोलंदाज आहे. जो दिग्गज ओपनर्सलाही तंबुत पाठवतो. वयाच्या 21 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आजही जर तो पहिल्या ओवर्ससाठी आला तर टीम इंडियाच्या फलंदाजांना सावध राहाणं गरजेचं आहे.
वयाच्या 21 व्या वर्षी आफ्रिदीला 19 कसोटी, 28 एकदिवसीय आणि 30 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव आहे. पाकिस्तानमधील अनेक लोक शाहिनची तुलना वसीम अक्रम आणि मोहम्मद अमीर यांच्याशी करतात. अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगदरम्यान मिकी आर्थॉनने शाहिन अफरिदीची तुलना मिचेल स्टार्कशी केली होती. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच चकीत केलं.
शाहिन अफरिदी टीम इंडियाच्या ओपनर्ससाठी धोक्याचा ठरणार की नाही ते आता येणाऱ्या सामन्यातच पाहायला मिळणार आहे. आजच्या महामुकाबल्याची उत्सुकता वाढली आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याची सुरुवात दुबईमध्ये होणार आहे.
सुपर -12 मधील टीम इंडियाचे सर्व सामने
24 ऑक्टोबर- भारत विरूद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर- भारत विरूद्ध न्यूजीलंड
3 नोव्हेंबर- भारत विरूद्ध अफगानिस्तान
5 नोव्हेंबर- भारत विरूद्ध स्कॉटलंड
8 नोव्हेंबर- भारत विरूद्ध नामीबिया
टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह