T20 World Cup 2021 Ind vs Pak: टीम इंडिया पहिल्यांदा करणार बॅटिंग, प्लेइंग-XI मध्ये बदल

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल, पाहा कोणाला मिळाली संधी?

Updated: Oct 24, 2021, 07:15 PM IST
T20 World Cup 2021 Ind vs Pak: टीम इंडिया पहिल्यांदा करणार बॅटिंग, प्लेइंग-XI मध्ये बदल  title=

दुबई: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होत आहे. दुबईतल्या इंटरनॅशनल स्टेडियमवर हायव्होल्टेज ड्रामा रंगणार आहे. पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी विराट सेना सज्ज झाली आहे. पाकिस्तान संघाने टॉस जिंकला आहे. टीम इंडिया पहिली फलंदाजी करणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. 

या मॅचमध्ये टीम इंडिया फेव्हरिट मानली जात आहे. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत पाकिस्तानला भारताविरोधात एकही मॅच जिंकता आलेली नाही त्यामुळे आजही भारतीय टीम आपल्या विजयाची परंपरा कायम राखेल असा विश्वास तमाम भारतीयांना वाटतो आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल.राहूल, हार्दिक पांड्या असे तगडे बॅट्समन भारताच्या ताफ्यात आहे. 
 
पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्यासाठी बुमराह, शमीच्या रूपात भेदक बॉलर्स भारताकडे आहेत. याशिवाय आर.अश्विन आणि जडेजाचा फिरकी माराही भारताच्या ताफ्यात आहे. तर पाकिस्तानच्या भात्यात बाबर आझम, फकर झमान, मोहम्मद रिझवान, शाहिन आफ्रिदीसारखे खेळाडू आहेत. त्यामुळे आज तमाम क्रिकेटप्रेमींना एक रंगतदार मुकाबला पाहायला मिळणार यात शंका नाही. 

टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आर अश्विन आणि ईशान किशनला या सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. हार्दिक पांड्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात खेळाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन 

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली ( कर्णधार),सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरूण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन

बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमां, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हारिस रऊफ आणि शाहिन आफ्रिदी