शानदार, जबरदस्त, जिंदाबाद | Curtis Campher ची कमाल, 4 चेंडूत 4 विकेट्स, पाहा व्हीडिओ

कर्टिसने कॅम्फरने (Curtis Campher) नेदरलंडच्या (Netherlands) डावातील 10 व्या ओव्हरमध्ये हा अफलातून कारनामा केला.

Updated: Oct 18, 2021, 07:33 PM IST
शानदार, जबरदस्त, जिंदाबाद | Curtis Campher ची कमाल, 4 चेंडूत 4 विकेट्स, पाहा व्हीडिओ

यूएई : टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील ग्रृप स्टेजमधील सामने खेळवण्यात येत आहेत. आयर्लंड विरुद्ध नेदरलंड या ग्रृप ए मधील संघांमध्ये आज (18 ऑक्टोबर) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आयर्लंडने नेदरलंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने (Curtis Campher) कमाल केली. कर्टिसने हॅटट्रिक घेतली. विशेष म्हणजे 4 चेंडूत 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. (T20 World Cup 2021 Ireland vs Netherlands Curtis Campher becomes 3rd bowler to pick 4 wickets in 4 balls in T20I)

यासह कर्टिस आयर्लंडकडून हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. तर टी 20 क्रिकेटमध्ये 4 चेंडूत 4 विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.  

10 व्या ओव्हरमध्ये कारनामा

कर्टिसने नेदरलंडच्या डावातील 10 व्या ओव्हरमध्ये हा अफलातून कारनामा केला. कर्टिसने ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर कॉलिन एकरमॅनला (Ackermann) कॅच  आऊट केलं. यानंतर त्याने तिसऱ्या बॉलवर ऑलराऊंडर रेयान डेस्काथेला (Ten Doeschate) एलबीडबल्यू केलं. 

चौथ्या चेंडूवर स्कॉट एडवर्ड्सला पायचीत करत हॅट्रिक पूर्ण केली. यासह कर्टिस टी 20 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला आयरिश गोलंदाज ठरला. यानंतर ओव्हरमधील रोलोफ व्हॅन डर मर्वेला (van der merwe) कॅच आऊट केलं. अशा प्रकारे कर्टिसने 4 चेंडूत 4 विकेट्स घेतल्या. कर्टिसने 4 ओव्हरमध्ये 6.50 च्या इकॉनॉमी रेटने 26 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज

दरम्यान कर्टिस टी 20 क्रिकेटमध्ये 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी असा कारानामा श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि अफगाणिस्तानच्या राशिद खानने (Rashid Khan) केला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गोलंदाजांनी 2019 मध्येच हा किर्तीमान केला होता. राशिदने आयर्लंड तर मलिंगाने न्यूझीलंड विरुद्ध ही कामगिरी केली होती. 

असा रंगला सामना

नेदरलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. निर्धारित 20 ओव्हरमध्ये 106 धावा केल्या. त्यामुळे आर्यलंडला 107 धावांचे माफक आव्हान मिळाले. आर्यलंडने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 15.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. आयर्लंडने यासह टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली.

4 wickets in 4 balls 

 
 
 
 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)