दुबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सेमीफायनलमधून बाहेर गेली आहे. दुसरीकडे फायनलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ आपली उत्तम कामगिरी दाखवत आहेत. त्यामुळे अंतिम सामन्याची स्पर्धा अधिक चुरशीची होत आहे. टी 20 वर्ल्ड कपमधून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येत आहे. दोन फलंदाजांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे.
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना आज होणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आपल्या ग्रूपमध्ये सर्व सामने जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाला आज मात्र मोठा झटका लागला आहे. याचं कारण म्हणजे दोन फलंदाजांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
हे दोन्ही फलंदाज संघासाठी खूप महत्त्वाचे होते. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी हे फलंदाज संघात असणं खूप गरजेचं असल्याचंही एकीकडे सांगितलं जात आहे. तर यंदाची ट्रॉफी पाकिस्तान जिंकणार की इंग्लंड याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सेमीफायनल सामन्याआधी विकेटकीपर आणि फलंदाज मोहम्मद रिझवान, शोएब मलिक या दोघांनाही ताप आला आहे. त्यामुळे हे सेमीफायनलचा सामना खेळू शकणार नाहीत.
शोएब मलिक आणि रिझवान या दोघांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली. ही चाचणी निगेटीव्ह आली आहे. दोन्ही खेळाडू लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना चाहते आणि क्रिकेटप्रेमी करत आहे. दोन्ही खेळाडू सध्या तापाने आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू संघात खेळणार नसल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे.
टी- 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची फलंदाजी उत्कृष्ट राहिली आहे. दोघांनीही प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानने भारता विरुद्धच्या डावातही धावांचा डोंगर रचला होता. रिझवानने टी- 20 वर्ल्ड कपच्या 5 सामन्यात 214 धावा केल्या आहेत.
मोहम्मद रिझवानने भारताविरुद्धही मॅचविनिंग इनिंग खेळली होती. त्याचबरोबर शोएब मलिकने फिनिशरची भूमिका साकारली. त्याने स्कॉटलंडविरुद्ध 18 चेंडूत 50 धावांची तुफानी खेळी खेळली होती. पाकिस्तान संघ यंदा खूप चांगली कामगिरी करत असल्याने यंदा हा संघ ट्रॉफी विनर ठरणार का याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
त्याच सोबत आज होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यात पाकिस्तान संघाचं टेन्शन वाढलं आहे. तर दोन्ही फलंदाज लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.