IND vs PAK सामन्यापूर्वी Team India अडचणीत; दमदार खेळाडू नाईलाजानं बेंचवर

Ind vs Pak : भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आता क्रिकेट रसिकांची उत्सुकला शिगेला पोहोचलेली असतानाच संघ मात्र काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Updated: Oct 19, 2022, 08:11 AM IST
IND vs PAK सामन्यापूर्वी Team India अडचणीत; दमदार खेळाडू नाईलाजानं बेंचवर  title=
T20 World Cup 2022 Deepak Hooda might not include in playing eleven in team india

T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघ 23 ऑक्टोबरपासून T20 World Cup 2022 मध्ये आपल्या कामगिरीची सुरुवात करणार आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आता क्रिकेट रसिकांची उत्सुकला शिगेला पोहोचलेली असतानाच संघ मात्र काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, या सामन्यात संघातील एका खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. मुख्य म्हणजे हा खेळाडू (Australia) ऑस्ट्रेलियाविरोधातील सराव सामन्यातही दिसला नव्हता. 

PAK  विरोधात कोणता खेळाडू खेळणार नाही? 
ऑस्ट्रेलियाविरोधात खेळवल्या गेलेल्या सराव सामन्यानंतर भारताचं प्लेइंग 11 जवळपास निश्चित झालं आहे. अशातच (India Vs Pakistan) पाकिस्तानविरोधातील सामन्यात संघात दीपक हुड्डा (Deepak Hooda) च्या उपस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. दीपक सराव सामन्यातही दिसला नव्हता, त्यामुळं हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

अधिक वाचा : NAM vs NED: नेदरलँडच्या विक्रमजीत सिंगने मारले सलग दोन षटकार, पण कौतुक बाळाचं! Video Viral

 

तिथे कमरेच्या दुखापतीतून सावरत दीपक या स्पर्धेसाठी संघासोबत पोहोचला असतानाच त्याच्या खेळणाबाबत शंका उपस्थि होऊ लागल्या आहेत. पाकिस्तान विरोधातील सामन्यासाठी ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अक्षर पटेल (Axar Patel) संघाची पहिली पसंती असतील. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं प्रदर्शनही चांगलं असल्यामुळे दीपकला बेंचवर बसावं लागू शकतं. 

दीपकच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर एक नजर... 
दीपक हुड्डा (Deepak Hooda)नं आतापर्यंत भारतीय संघासाठी 12 टी20 आणि 8 एकदिवसीय सामने खेळला आहे. मुख्य म्हणजे या सर्व सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला आहे. टी20 सामन्यांमध्ये त्यानं 41.86 च्या सरासरीनं 293 धावा केल्या आहेत. तर, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं, 28.2 च्या सरासरीनं 141 धावा केल्या आहेत. 

अधिक वाचा : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू डाळ-भाताबरोबर खातो आईस्क्रीम, विराट कोहलीने सांगितलं नाव

टी20 वल्ड कपसाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, आर पंत (Wicket keeper), दिनेश कार्तिक (Wicket keeper), हार्दिक पांड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी. (Rohit Sharma (Captain), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rishabh Pant (wicket-keeper), Dinesh Karthik (wicket-keeper), Hardik Pandya, R. Ashwin, Yuzvendra Chahal, Axar Patel, Bhuvneshwar Kumar, Harshal Patel, Arshdeep Singh, Mohammed Shami.)