T20 World Cup 2022: India Vs Pakistan सामन्यापूर्वी WWE चॅम्पियन 'द रॉक'नं दिला संदेश, म्हणाला...

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असली तर क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघामधील सामना एखाद्या लढाईसारखा असतो. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ल्डकप स्पर्धेतील महामुकाबला 23 ऑक्टोबरला मेलबर्न मैदानात होणार आहे.

Updated: Oct 19, 2022, 07:26 PM IST
T20 World Cup 2022: India Vs Pakistan सामन्यापूर्वी WWE चॅम्पियन 'द रॉक'नं दिला संदेश, म्हणाला... title=

India Vs Pakistan Match The Rock: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असली तर क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघामधील सामना एखाद्या लढाईसारखा असतो. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ल्डकप स्पर्धेतील महामुकाबला 23 ऑक्टोबरला मेलबर्न मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी वर्ल्ड रेसलिग इंटरटेनमेंट सुपर स्टार द रॉकनं खास संदेश दिला आहे. 20 सेकंदाचा हा संदेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

"जेव्हा दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होतो तेव्हा संपूर्ण जग थांबतं. हा सामना सामान्य नाही. आता भारत पाकिस्तान सामन्याची वेळ आली आहे. हा एक महामुकाबला असणार आहे", असं द रॉक सांगताना दिसत आहे.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद हरीस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहनी.