पाकिस्तानच्या अपयशानंतर काकूंचा राग अनावर ..., Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 12, 2022, 03:08 PM IST
पाकिस्तानच्या अपयशानंतर काकूंचा राग अनावर ..., Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल... title=

मुंबई : आशिया चषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानला 23 धावांनी हार मानावी लागली. वनिंदू हसरंगा व भानुका राजपक्षा या दोघांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेनं हा विजय मिळवला. 2014 नंतर प्रथमच श्रीलंकेनं आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेच्या या विजयानंतर पाकिस्तानी चाहाते नाराज असून अनेकांनी पाकिस्तानी संघावर टिका केली आहे. अशाच एका पाकिस्तानी चहातीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Pakistani Fans Thrashing Their Own Team after they loose against Sri Lanka in Asia Cup Final trending news 2022) 

आणखी वाचा : 'सेक्स, सेक्स आणि...', अनिल कपूर यांनी तरुण दिसण्याचं सिक्रेट केलं शेअर

पाकिस्तानच्या चाहत्यांना हा पराभव पचवणे जड गेल्याचे मैदानाबाहेरील चाहत्यांशी बोलताना जाणवत होते. या व्हिडीओत ती संतापलेली महिला बोलते की या लोकांनी ना बॅटिंग, ना फिल्डिंग आणि ना बॉलिंग केली. या लोकांनी पूर्ण सत्यानाश करून ठेवला आहे. या लोकांनी रात्री फक्त पिझ्झा नाही तर आणखी काय काय खाल्ल माहित नाही. आज कायदे आझम यांच श्राद्ध होतं. मला आधीच टेन्शन आलं होत... इज्जत घालवली यांनी. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Trending Video on Pakistan and Sri Lanka Match)

आणखी वाचा : समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय? शरद पोंक्षे यांचा Video Viral 

Bas Bai Bas : 'मी हार्ट ब्रोकन झाले...', सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, या आधी भारताविरोधात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर एका नेटकऱ्यानं पाकिस्तानी खेळाडूंनी रात्री पिझ्झा आणि बर्गर खाल्याचे म्हटले होते. ‘मला कळलंय की काल रात्री हे लोक (पाकिस्तानी खेळाडू) बर्गर आणि पिझ्झा खात होते. त्यांनी क्रिकेट सोडून कुस्तीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. खेळाडूंचा फिटनेस वगैरे काही मैदानात दिसतच नाही. आम्ही यांच्याकडून एवढ्या अपेक्षा ठेवल्या आहेत आणि हे लोकं बर्गर खात आहेत,’ अशी टिका या चाहत्याने केली होती. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर अनेकांनी प्रश्न केले होते. या व्हिडिओबरोबच इतरही अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी ट्विटवरुन पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवरुन निशाणा साधल्याचे दिसत आहे.