Team India Playing 11 By ICC: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर समोर आला आहे. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियानं आशिया कप विजेत्या श्रीलंकेला (Namibia Vs Sri Lanka) पराभूत करत स्पर्धेत रंगत आणली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील गणित पहिल्या सामन्यापासूनच जर तरने सुरु झालं आहे. सुपर 12 (Super 12) चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. 23 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने सर्व संघांच्या प्लेईंग 11 (ICC Playing 11) ची घोषणा केली आहे. आयसीसीद्वारे निवडलेल्या खेळाडूंची नावं वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
आयसीसीने निवडलेल्या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmad Shami), रविचंद्रन अश्विन (R. Ashwin), दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना स्थान मिळालेलं नाही. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी संघात मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलं आहे. प्लेईंग 11 मध्ये सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना पसंती देण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, तर चौथ्या क्रमांकावर आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात आली आहे.
T20 World Cup: "टीम इंडिया घाबरत घाबरत खेळते", वर्ल्डकपपूर्वी माजी कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत
मधल्या फळीतील फलंदाजीची धुरा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यांच्या खांद्यावर असणार आहे. तर गोलंदाज म्हणून अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि हर्षल पटेल यांना स्थान देण्यात आलं आहे. मोहम्मद शमी आणि आर. अश्विन यांना डावलण्यात आलं आहे.
ICC ची संभावित भारतीय प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह