भावाने इच्छा नसताना ठोकलं अर्धशतक, कॅमेरामध्ये सूर्याचं 'ते' बोलणं झालं कैद!

सूर्यकुमार यादवचा सामन्यादरम्यानचा तो व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल!

Updated: Oct 17, 2022, 04:53 PM IST
भावाने इच्छा नसताना ठोकलं अर्धशतक, कॅमेरामध्ये सूर्याचं 'ते' बोलणं झालं कैद! title=

Suryakumar Viral Video : टी-20 वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात झाली असून सुरूवातीच्या सामन्यांमध्ये अनपेक्षित असे निकाल पाहायला मिळत आहे. आशिया कपवर नाव कोरणाऱ्या श्रीलंका संघाचा नामिबिया संघाने पराभव केला. तर आज वेस्ट इंडिजलाही स्कॉटलँड संघाने पराभवाची धूळ चारली. तर आजच्या भारत आणि यजमान ऑस्ट्रिलियामध्ये झालेल्या सराव सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमारची बोलणं माईकमध्ये कैद झालं आहे. (t20 world cup india vs australia Practice Match suryakumar yadav wicket Viral video)

आजच्या सामन्याध्ये सूर्याने त्याच्या 360 स्टाईलमध्ये शानदार खेळी केली. त्याने स्वीप शॉट आणि पॅडल मारले, मात्र सूर्या ज्यावेळी बाद झाला त्याआधी नॉन स्ट्राईकवर असलेल्या हर्षल पटेलला म्हणाला, मारने का मन ही नही हो रहा यार! सूर्याचं हे बोलणं माईकमध्ये कैद झालं. 

सूर्याने 33 चेंडूत 50 धाव काढल्या होत्या त्यावेळी 20 षटक रिचर्डसन टाकत होता, 3 चेंडू झाले होते. चौथ्या चेंडूच्या आधी सूर्या अक्षर पटेलला म्हणाला की, शॉट मारायची इच्छाच होत नाय्ये, त्यानंतर रिचर्डसने फुलटॉस टाकला मात्र सूर्याच्या बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत उडाला. रिचर्डसननेच हा चेंडू पकडला त्यावेळी तोही स्वत:च शॉक झाला होता. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

जर तो चेंडू सूर्याच्या बॅटच्या मधोमध बसला असता तर थेट स्टेडिअममध्ये गेला असता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायल मिळत आहे. 

भारताने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी असणार आहे.