IND vs ENG: Semi Final खेळणार की नाही, दुखापतीविषयीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं स्पष्ट उत्तर

IND vs ENG T20 World Cup 2nd Semi-Final​ : टी20 वर्ल्ड कपची सुरुवात झाल्यानंतर आता क्रिकेटचं महाकुंभ असणारी ही स्पर्धा सांगतेकडे वळली आहे. आज स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना (NZ vs PAK Semi Final) पार पडणार आहे, तर उद्या (गुरुवार 10 नोव्हेंबर 2022) रोजी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पार पडणार आहे. 

Updated: Nov 10, 2022, 12:02 PM IST
IND vs ENG: Semi Final खेळणार की नाही, दुखापतीविषयीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं स्पष्ट उत्तर  title=
T20 World Cup Rohit sharma press conferance before semi final against england

Rohit Sharma Fit to Play vs England, Semi Final T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपची सुरुवात झाल्यानंतर आता क्रिकेटचं महाकुंभ असणारी ही स्पर्धा सांगतेकडे वळली आहे. आज स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना (NZ vs PAK Semi Final) पार पडणार आहे, तर उद्या (गुरुवार 10 नोव्हेंबर 2022) रोजी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पार पडणार आहे. दुसरा सामना भारतीयांसाठी अतीमहत्त्वाचा असेल, कारण यामध्ये इंग्लंड आणि भारत (India vs England) हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. 

उपांत्य फेरीसाठी मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं एका पत्रकार परिषदेतून बऱ्याच गोष्टींबाबतचे समज, गैरसमज दूर केले आणि चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी रोहितनं त्याच्या फिटनेसवरही वक्तव्य केलं. 

संघाच्या कामगिरीविषयी काय बोलला रोहित? (Rohit Sharma on team mates)

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला चांगलं प्रदर्शन करायचच आहे. पण, याचा अर्थ भूतकाळात केलेलं प्रदर्शन विसरणं असा होत नाही, असं म्हणत एक सामना तुमच्याबाबतचं मत तयार करत नाही ही बाब त्यानं अधोरेखित केली. 

वाचा : T20 World Cup 2022: कोच द्रविडसह रोहित- विराट संघातील खेळाडूंशी असं का वागले? राहून राहून सर्वांनाच पडतोय प्रश्न

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) काही मैदानांची बाऊंड्री मोठी आहे काहीचीं लहान, काहींची एका बाजूनं मोठी बाऊंड्री आहे तर काहींची एकाच बाजूनं लहान. या सर्व मुद्द्यांवर आम्ही लक्ष देत असून त्यासंबंधी चर्चाही केल्या, असं सांगत खेळामध्येही त्याच धर्तीवर बदल होणार असल्याचे संकेत त्यानं दिले. 

स्वत:च्या फिटनेसबाबत काय म्हणतोय रोहित? 

मंगळवारी रोहितच्या हाताच्या मनगटाला दुखापत (Rohi sharma injury) झाल्याची माहिती समोर आली आणि क्रिकेट जगतात चिंतेची लाट पसरली. आपल्या याच दुखापतीबाबतही तो स्पष्टच बोलला. 'हो मला काल दुखापत झाली होती, पण आता मी उत्तम आहे. काल लहानशी जखम होती पण आता ती पूर्णपणे बरी आहे', असं सांगत आपण सामन्यासाठी तयार असल्याचे संकेत त्यानं दिले. 

पंत की कार्तिक, Semi Final मध्ये कोणाची वर्णी? रोहित शर्माचं सूचक उत्तर 

आपला संघ उपांत्य फेरीत जाईल, किंवा तिथे कोणत्या संघाच्या विरोधात आपल्याला खेळायचं आहे याची काहीच कल्पना नसल्याचं रोहितनं सांगत ऋषभ पंतच्या विषयाला हात घातला. पंतनं सराव सामन्याव्यिरिक्त कोणत्याही सामन्यात सहभाग घेतलेला नाही. त्याला थेट Semi Final मध्ये खेळवणं योग्य नसेल. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही Wicket Keepars (Rishabh Pant Dinesh Kartik) उपलब्ध आहेत. त्यामुळं कोण खेळेल यावरून गुरुवारीच पडदा उचलण्यात येणार आहे. 

वाचा : "इग्लंडविरूद्धच्या मॅचमध्ये ना विराट ना सूर्या 'हा' खेळाडू ठरणार गेमचेंजर"

सुर्यकुमारचं कौतुक करताना थांबला नाही रोहित (Suryakumar Yadav)

Sky is the limit for him... असं म्हणत रोहितनं सूर्यकुमार यादवच्या खेळीवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. यावेळी एका कर्णधारासाठी संघातील खेळाडूची चांगली कामगिरी किती महत्त्वाची असते याची प्रचिती आली. अक्षर पटेलच्या गोलंदाजीमुळं आम्हाला काहीच अडचण नसल्याचं म्हणत रोहितनं आपला मोर्चा सूर्यकुमारकडे वळवला. 

सूर्यानं खेळामध्ये परिपक्वता दाखवली असून त्याला लहान मैदानांच्या तुलनेच मोठ्या मैदानांमध्ये खेळायचा आवडतं कारण तिथे त्याला मोठे फटके मारण्याची संधी असते, असं रोहित म्हणाला. 

संघातील खेळाडूंवर विश्वास टाकत रोहितनं एक कर्णधार म्हणूनही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आतापर्यंत बजावली. आता हाच रोहित संघाला वर्ल्ड कप (T20 World Cup trophy)मिळवून देतो का हे पाहणं औत्सुत्याचं ठरणार आहे.