IND vs ENG T20 World Cup, 2nd Semi Final : टी-20 वर्ल्ड कप (T20 world cup) जिंकण्यापासून दोन पावलं दूर असणाऱ्या भारतीय संघ आज इंग्लंडसोबत (IND vs ENG) भिडणार आहे. पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा (pak vs nz) पराभव केल्यानंतर आता भारतीय संघाला इंग्लंडचा अडथळा दूर करावा लागणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखालील संघात आज बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्ताननेही अंतिम फेरी गाठल्याने भारतीय संघासोबत त्याचा सामना व्हावा अशी भारतीय चाहत्यांना आशा आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या (England) तुलनेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. मात्र आतापर्यंत जेव्हा जेव्हा भारत विरुद्ध इंग्लंड अशी लढत झाली तेव्हा कोण वरचढ ठरलं यावरही आजच्या सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
आज अॅडलेड ओव्हल (adelaide oval) येथे भारत आणि इंग्लंड एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारताने सुपर 12 मध्ये चार सामने जिंकत ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये विराट कोहली (virat kohli) आणि सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी फलंदाज ठरले असून त्यांच्याकडून उपांत्य फेरीत मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही फलंदाज इंग्लंडसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.
Virat Kohli : विराट कोहली आज अॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज
इंग्लंडने सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला. मात्र गेल्या दोन वर्षातील दोन्ही संघांची आकडेवारी पाहिली तर भारतीय संघ इंग्लंडच्या संघापेक्षा सरस ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध भारताचे फलंदाजच नव्हे तर गोलंदाजही यशस्वी कामगिरी करत आहेत. -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही इंग्लंडविरुद्ध भारताला अनेकवेळा विजय मिळाला आहे.
अॅडलेडच्या मैदानावर भारताने आतापर्यंत दोन टी-20 सामने खेळले आहेत आणि दोघांमध्ये विजय मिळवला आहे. टी- 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंड 22 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने 12 सामने जिंकलेत तर इंग्लंडच्या संघाने 10 सामने जिंकले आहेत. भारत आणि इंग्लंड संघ 1987 नंतर (35 वर्षांनंतर) प्रथमच जागतिक स्तरावरील स्पर्धेत उपांत्य फेरीत भिडणार आहेत. तसेच दोन्ही संघ पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भिडणार आहेत. याआधी 1983 आणि 1987 मध्ये दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोनदाआमनेसामने आले होता. यावेळी एक सामना भारताने तर एक सामना इंग्लंडने जिंकला होता.
IND vs ENG Weather Report : भारत विरूद्द इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर...कसं असेल समीकरण?
टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात इंग्लंडचा विजया झाला आहे. यावेळी दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी आमनेसामने आहेत. भारत आणि इंग्लंड दोनदा तटस्थ मैदानावर आमनेसामने आले आहेत. तर यावषी भारत आणि इंग्लंडमध्ये तीन टी-20 सामने झाले. यापैकी टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात तिन्ही टी-20 सामने खेळले गेले होते. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली होती.